Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमीच; गुडघ्याला बाशिंग बांधलेले आमदार काय करणार?

Cabinet expansion News : शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

Cabinet expansion News : शिंदे - फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आलं. त्यानंतर छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारही झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यानंतर आता अनेक आमदारांचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेलं असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशन आटोपून नव्या वर्षात १५ जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या. मात्र नव्या वर्षातील या मुहूर्तावरही शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या तरी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं वाटत नाही, असं सरकारमधील काही मंत्री सांगत आहेत. त्यामुळे इच्छुक आमदारांच्या पदरी मात्र निराशाच पडणार असल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) पक्षातील आमदारांमधील धुसफूस समोर येण्याच्या भीतीनेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Praveen Darekar : प्रवीण दरेकरांना पडली नरेंद्र पाटलांच्या 'बीएमडब्ल्यू'ची भुरळ; मारली राईड

तसेच पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सरकारचे कामकाज सुरळीत सुरू आहे, असे सांगत याच सरकारमधील काही मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराला विरोध केल्याची देखील चर्चा आहे. तसेच दुसरीकडे नेमकी कोणाला मंत्री करायचे? यावरून भाजपमध्ये निर्णय होत नसल्याने हा विस्तार रखडल्याचे शिंदे गट बोट दाखवत आहे.

तर शिंदे गटातील नऊ मंत्र्यांना इतर सहकारी नको असल्याने नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत नसल्याचीही चर्चा होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये १८ मंत्री आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची समजूत काढून, पहिल्या विस्तारानंतर गेल्या वर्षी १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा विस्तार करण्याचे आश्वासन दोन्ही गटांकडून दिले होते.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Pune Crime : पठ्ठ्याने सीएलाच मागितली ३० लाखांची खंडणी

त्यानंतर ऐन दिवाळीत विस्तार होण्याची शक्यता होती. हे दोन्हीही मुहूर्त हुकल्यानंतर १० डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या आधी विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यासाठी ५ ते ९ डिसेंबर या कालावधीतील मुहूर्त निवडला जाण्याचा अंदाज होता. मात्र, तसे काही घडले नाही.

त्यानंतर अधिवेशन काळात १५ जानेवारीपर्यंत विस्तार करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही याबाबतची पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विस्तार होणार की नाही, असा प्रश्न कायम आहे. तर मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आमदार आता काय करणार? असा सवालही करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com