Tanaji Sawant News
Tanaji Sawant News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant News : तानाजी सावंतांचं धक्कादायक विधान; म्हणाले,'' बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते...''

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur News : शिंदे गटाचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. तसेच त्यांच्याकडून ठाकरे गटासह महाविकास आघाडीवरही सडकून टीका केली जाते. दोन दिवसांपूर्वीच सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात तब्बल दीडशे बैठका झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. आता पुन्हा एकदा सावंत यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर तानाजी सावंत यांची सभा झाली. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सावंत म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उध्दव ठाकरेंचीही सभा याच मैदानावर झाली होती.परंतू, त्यांच्या सभांना जितकी गर्दी जमली नाही,त्यापेक्षा अधिक गर्दी सावंत बंधूनी याच मैदानावर जमवून दाखवली असं मोठ वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले ?

पंढरपूर येथील सभेचे नियोजन मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे होते. या सभेला सात लाख लोक आल्याचा नवा दावाही त्यांनी केला आहे. अलिकडेच मालेगाव येथील उध्दव ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्या सभेला उद्देशून बोलत असताना डॉ.सावंत यांनी जे बाळासाहेबांना जमलं नाही ते सावंत बंधूनी पंढरपुरात करुन दाखवल्याचं सांगत उध्दव ठाकरे यांना‌ टोला‌ लगावला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो,परंतु...

सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो,परंतु मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले हे माझे दुर्देव असल्याची खंत व्यक्त करत अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा मला सोलापूरचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सोलापूरच्या पालकमंत्री पदावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ...म्हणून दीडशे बैठका घेतल्या!

...म्हणून दीडशे बैठका घेतल्या!

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे बोलत असताना महाराष्ट्रातील सत्तांतरावर मोठं भाष्य केलं होतं. सावंत म्हणाले, नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला. मात्र, उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचं कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या असल्याचा गौप्यस्फोट डॉ. तानाजी सावंत यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT