APP Posters Against BJP: मोदींच्या विरोधात APP ची मोहिम ; ११ भाषांमध्ये पोस्टरबाजी रंगणार

APP Printed Posters in 11 Languages: 'आप'ने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.
Arvind kejriwal - PM Narendra Modi
Arvind kejriwal - PM Narendra ModiSarkarnama

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे.आम आदमी पक्षाने काल (मंगळवारी) दिल्ली येथे 'मोदी हटाओ देश बचाओ' असा मजकूर असलेले पोस्टर ११ भाषांमध्ये प्रदर्शित केले आहेत.

आम आदमी पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी याबाबत माहिती दिली. ३० मार्च रोजी हे पोस्टर देशभर लावण्यात येणार आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आपल्या राज्यात हे पोस्टर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोपाल राय म्हणाले, "'मोदी हटाओ देश बचाओ'हे पोस्टर मराठीसह , हिंदी, उर्दू, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, तेलगु, बंगाली, कन्नड आदी ११ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.

Arvind kejriwal - PM Narendra Modi
Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

'आप'ने ११ भाषांमध्ये प्रदर्शित केलेले पोस्टर काही दिवसापूर्वी राजधानी दिल्ली येथे लावण्यात आले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्षामध्ये पोस्टरवॉर रंगले होते. याप्रकरणी 'आप'च्या सहा जणांना अटक केली होती.

'आप'च्या पोस्टरला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने 'केजरीवाल हटाओ, दिल्ली बजाओ'अशा आशयाचे पोस्टर दिल्लीत विविध ठिकाणी लावण्यात आले होते.

Arvind kejriwal - PM Narendra Modi
BJP News : भाजपवर दु:खाचा डोंगर ; तीन महिन्यात 'ताई', दोन 'भाऊ' गमावले..

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यासाठी पक्षाने पाच नवे पाच राष्ट्रीय संयुक्त सचिवांची नियुक्ती केली आहे.

सुधीर वधानी, उमेश मकवाना, हेमंत खावा, भूपत भयानी, पंकज सिंह यांचा यात सहभाग आहे. सुधीर वधानी, उमेश मकवाना, हेमंत खावा आणि भूपत भयानी हे गुजरातमध्ये 'आप'चे आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com