Teacher-Graduate Election Results : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Teacher-Graduate Election Results : शिक्षक-पदवीधर असूनही चुकले, 'तब्बल' इतकी मते बाद ठरली!

Teacher-Graduate Election Results : पदवी मिळवूनही मतदान करता येईना!

सरकारनामा ब्यूरो

Teacher-Graduate Election Results : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी नुकतेच मतदान पार पडले. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले. आज निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. प्रत्यक्ष मतमोजणी होताना महाविकास आघाडी पुढे असलेले दिसून येत आहे.

एकीकडे निकालाची लगबग सुरू असताना बाद किंवा रद्द केलेल्या मतांची संख्याही मोठी दिसून येत आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पसंतीक्रमानुसार असते. मात्र मतदान हे शिक्षक आणि ज्यांच्याकडे विद्यापीठाची पदवी आहे, असे सुशिक्षित उमेदवार मतदान करतात. तेव्हा अशा मतदारांकडून मतदान प्रक्रियेत कसूर राहणे, अपेक्षित नसते. मात्र पदवीधर असूनही निवडणुकीत अनेक पदवीधर मतदान करताना चुकले आहेत. मतदानात त्यांच्याकडून कसूर झाले आहे.

सर्वाधिक मते बाद नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेले दिसून येत आहे. दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना ३१ हजार ००९ मते तर शुभांगी पाटील यांना १६ हजार ३१६ मते मिळाली आहेत. तर तब्बल ५४४५ मते बाद ठरवण्यात आली आहेत.

या निवडणुकीत 53,257 शिक्षकांनी मतदान केले होते, त्यापैकी 2485 मते बाद झाली आहेत. तर 50,771 मते वैध ठरले आहेत. अमरावती पदवीधर निवडणुकीत 73 टपाली मतपत्रिका मतमोजणीत बाद झाल्या. या कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसोबत घोषणापत्र न दिल्याने ही मते बाद ठरली आहेत. तर नागपूर शिक्षक पदरसंघात 1099 मते बाद ठरली आहेत.

यामुळे पदवीधर आणि शिक्षक ही अर्हता धारण करून ही मतदान करता येत नाही का? हा मुद्दा उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदवीधरांचे मते बाद ठरत असतील तर, हा काळजीचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT