Satyajeet Tambe : पुढील राजकीय वाटचालीबाबत सत्यजीत तांबे यांचे मोठे विधान; म्हणाले..

Satyajeet Tambe : मतदारांच्या नावामध्ये गोंधळ होता.
Satyajeet Tambe : Nashik
Satyajeet Tambe : NashikSarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार व ज्यांच्या विजयाची औपचारिकाता म्हणून सत्यजीत तांबे यांनी पुढच्या राजकीय भूमिकेबाबत भाष्य केले आहे. विजयानंतर आपली राजकीय भूमिका लवकरच जाहीर करण्याचे सुतोवाच तांबे यांनी केली आहे. यामुळे ते येत्या काही दिवसात काय भूमिका घेतात? ते भाजपप्रवेश करणार का? याबाबत चर्चा होताना दिसत आहे.

'

Satyajeet Tambe : Nashik
Teacher-Graduate Election Results : महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आघाडीवर : भाजपला धक्का!

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीणमध्ये मतदान कमी झाल्याबद्दल तांबे म्हणाले, "सोमवारचा लोकांचा कामाचा दिवस होता, लोकांची थोडीशी अडचण झाली होती. मतदारांच्या नावामध्येही गोंधळ होते. अशा काही अडचणींमुळे मतदानाची टक्केवारी घटली." तसेच यावेळी त्यांना विजयानंतर आपली राजकीय भूमिका काय असेल ? असा प्रश्न विचारलं असता ते म्हणाले की, "विजयीनंतरची राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करेन," यामुळे ते आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार की, भाजपप्रवेश करणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Satyajeet Tambe : Nashik
MLC Eletion Results : अद्यापही मतमोजणी सुरूच; काळे, तांबे, लिंगाडे आघाडीवर, पण..

काँग्रेसचे पदाधिकारी व सत्यजीत यांचे सहकारी मानस पगार यांचे आज निधन झाले. त्यांच्या घरी कुटुंबियांशी ते भेट घेऊन सात्वंन करण्यासाठी आले होते. तांबे म्हणाले, "विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती, असे तांबे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com