Shaktipeeth Highway Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shaktipeeth : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला विरोध करणं शिक्षकाला महागात; कोल्हापूर मनपाने दाखवला घरचा रस्ता

Girish Fonde's Suspension Due To Shaktipeeth : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. यादरम्यान शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने त्यांची सभा उधळून लावू असा इशारा दिला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाला शक्तिपीठ विरोधी कृती समितीने विरोध केला आहे. कृती समितीचे निमंत्रक म्हणून नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड गिरीश फोंडे यांना कोल्हापूर महानगरपालिकेने दणका दिला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत तो रद्द करण्याचा आदेश काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावा, अन्यथा आज कोल्हापुरात होणाऱ्या आभार यात्रेची सभा उधळून लावू असा इशारा दिला होता. शासकीय धोरणाला विरोध केल्यावरून कोल्हापूर महानगरपालिकेकडून त्यांच्यावर कारवाई करताना त्यांचे निलंबन केले आहे.

कोल्हापुरातील लोणार वसाहत विद्यामंदिर या शाळेतील सहायक शिक्षक गिरीश फोंडे हे काम करत होते. शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ त्यांचे निलंबन केले आहे. उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने फोंडे यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भातील आदेश उपायुक्त पंडित पाटील यांनी दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश कोंडे हे सामाजिक विषय हाताळत संघटनाच्या माध्यमातून त्यावर आंदोलन करताना दिसतात. आताही त्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात आवाज उठवला होता. सध्या ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील लोणार वसाहत विद्यामंदिरमध्ये कार्यरत असून विविध विषयावर आवाज उठवत असतात.

दरम्यान महानगरपालिकेने केलेल्या कारवाईच्या पत्रात म्हटले आहे की, फोंडे यांनी तीन एप्रिल रोजी शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्‍याचे निदर्शनास आला आहे. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातील तरतुदीचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केली आहे.

त्याअर्थी त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम अन्वये महानगरपालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत गिरीश फोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT