Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : अबुधाबीत सोलापूरचे 10 नागरिक अडकले; पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Jaykumar Gore Statement : अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून सोलापूरचे १० नागरिक अबुधाबीत अडकले आहेत. जयकुमार गोरेंनी सर्व भारतीयांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 01 March : अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून सोलापुरातील 10 नागरिक अबुधाबीत अडकले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री गोरे हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापुरातील १० नागरिकांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले, गेली दहा ते पंधरा दिवसांपासून इराणमधील भारतीय नागरिकांना इराण सोडा, असे सांगितलं होतं. भारत सरकारच्या विनंतीला मान देऊन काही लोकांनी इराण सोडून सुरक्षित ठिकाणी पोहचले आहेत.

संभाजी महाराज बलिदान मासाबाबत जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आज राज्य आणि केंद्र सरकार काम करतंय. संभाजी महाराजांनी जो त्याग आणि धर्माचं शिक्षण दिलं आहे, यातून नव्या पिढीला माहिती व्हावी, हा उद्देश असतो. गेली 42 वर्षांपासून बलिदान मासनिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याला आपण व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत.

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी टिपू सुलतानाबाबत केलेल्या वक्तव्यावर गोरे म्हणाले, छत्रपतींच्या वंशजाने काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हाला तो विचार अजिबात पसंत नाही. छत्रपतींच्या विचारांची आम्ही पाठराखण करत राहू. ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला, तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात असताना त्यांचेच विचार आपण मांडले पाहिजेत. त्याच विचारांचा पुरस्कार आपण केला पाहिजे. त्यापलीकडे जाऊन मला वाटतं, टिपू सुलतान आणि अशा व्यक्तींच गुणगान करणे उचित नाही. अशा प्रकारचे बोलणं किमान त्यांच्या वंशातील लोकांकडून येऊ नये, हीच भावना. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी हे व्यक्त करतो, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत गोरे म्हणाले, सोलापुरातील जनतेने विक्रमी बहुमत आम्हाला दिलं आहे. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांत भारतीय जनता पक्षाला एवढं बहुमत कधी मिळालं नव्हतं. पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झालेली असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT