BJP Nominated Corporator : सोलापूर भाजपच्या बहुचर्चित स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; शहराध्यक्षांसह पाच निष्ठावंतांना संधी

Solapur Corporation Sabha : सोलापूर महापालिकेची स्वीकृत नगरसेवक यादी जाहीर झाली. भाजपने नऊपैकी आठ नावे जाहीर केल्याने पहिल्याच सभेत गोंधळ उडाला. एमआयएमकडून नय्यूम सालार यांची नियुक्ती झाली.
Solapur BJP Nominated Corporator
Solapur BJP Nominated CorporatorSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 February : सोलापूर महापालिकेच्या बहुचर्चित स्वीकृत नगरसेवकाची यादी आज (ता. 20 फेब्रुवारी) जाहीर झाली. त्यातही भाजपच्या वाट्याला आलेल्या नऊपैकी आठ जणांची नावे जाहीर केली. यात शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह भाजप आणि संघ परिवारामधून आलेल्या पाच निष्ठावंतांसह काही माध्यम प्रतिनिधींनाही पक्षकडून संधी देण्यात आली आहे. एमआयएमकडून नय्यूम सालार यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपने नऊपैकी आठच नावे जाहीर केल्याने पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला आणि गोंधळताच सभा तहकूब करण्याची वेळ भाजपवर आली.

सोलापूर महापालिकेच्या (Solapur Corporation) १०२ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ८७ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी गेल्यानेत त्यांच्या सभागृहात महापालिकेत दहा जागा स्वीकृत नगरसेवक म्हणून भरता येणार होत्या. त्या १० जागांसाठी भाजप आणि एमआयएम पक्षाकडून तब्बल ६२ अर्ज आले होते.

भाजपच्या (BJP) वाट्याला नऊ, तर एमआयएमला संख्याबळाच्या आधारे एक जागा मिळणार होती. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दहा जणांची नावे जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ नऊजणांची नावे या सभेत जाहीर झाली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वच नावे जाहीर करण्याच्या मागणीवरून गोंधळ घातला, त्यामुळे भाजपला कामकाज तहकूब करावे लागले.

भारतीय जनता पक्षाकडून शहराध्यक्ष रोहिणी तडळवकर, रुद्रेक्ष बोरामणी, ज्ञानेश्वर म्याकल, श्रीनिवास दायमा, अक्षय अंजिखाने ह्यांना भाजप आणि संघ परिवारातील निष्ठावंतांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षासोबत असलेल्या वृषाली चालुक्य आणि मोची समाजातील ऋषिकेश म्हेत्रे, तसेच माध्यम प्रतिनिधी म्हणून मनीष केत यांनाही भाजपनेही स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.

Solapur BJP Nominated Corporator
Solapur Corporation : सोलापुरात ‘स्वीकृत’वरून प्रचंड गोंधळ; नाव कट झालेल्या भाजप इच्छुकाचा आत्महत्येचा इशारा, अमोल शिंदेंना मेसेज

भारतीय जनता पक्षाकडून नऊच्या ऐवजी आठ जणांची नावे जाहीर केली आहे, त्यामुळे सभेत प्रचंड गोंधळ झाला. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी उर्वरीत एक नाव जाहीर करण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. त्या गोंधळातच महापौर विनायक कोंड्याल यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका इच्छुकाने आपल्याला मेसेज केला आहे. त्यात त्यांनी बालाजी सरोवरमध्ये सध्या उपस्थित असलेल्या काही नेत्यांची आणि आमदाराचे नाव लिहून आपण आत्महत्या करणार आहोत, असे मेसेज म्हटले आहे, असा धक्कादायक दावा नगरसेवक अमोल शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

Solapur BJP Nominated Corporator
Election News : विलासराव देशमुखांचा पराभव ते बजाज यांचा विजय..! सूत्रधार कोण? राज्यसभा निवडणुकीआधी भाजप नेत्यानं घातला घाव...

एमआयएमकडून नय्यूम सालारांना संधी

एमआयएमकडून नय्यूम सालार यांना पक्षाने संधी दिली आहे. त्यांना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी निवडणुकीच्या काळातच शब्द दिला होता, त्यानुसार एमआयएमकडून सालार यांची नियुक्ती स्वीकृत नगरसेवकपदी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com