Ajit Pawar Ladki Bahin Yojana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ladki Behen Yojana : 'स्थानिकच्या निवडणुका होताच दादाच लाडकी बहीण योजनेला टाळं ठोकतील?', ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा दावा

Vinayak Raut On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहीण योजनेला कात्री लाण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत लाखो बहिणींना महायुती सरकारने अपात्र ठरवले आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सुरू केली होती. यानंतर राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले. आता राज्यात महायुतीचे सरकार आले असून लाडकी बहिण योजनेत निकश लावले जातायत. यामुळे लाखो बहिणी अपात्र ठरल्या असून विरोधकांनी यावरून सरकारवर वेळोवेळी हल्लाबोल केला आहे. तर ही योजनाच महायुती बंद करेल असा दावा आता विरोधक करत आहेत. दरम्यान असाच दावा ठाकरे गटाच्या एका माजी खासदाराने केला आहे. तर या योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच टाळे ठोकतील असा दावाही या नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

काही महिन्यांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना आणल्या होत्या. त्यातील आता लाडका भाऊ, तीर्थक्षेत्र दर्शन योजना बंद झाल्या आहेत. तर शेतकरी कर्ज माफी मिळणार नाही असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी याआधीच दिलं आहे. तर लाडकी बहिणी योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. यामुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली असून ही योजनाच आता सरकार बंद करणार असल्याचा दावा याआधी देखील विरोधकांनी केला होता. पण कोणत्याही स्थितीत ही योजना बंद केली जाणार नाही. ही गरीबांसाठी योजना असून त्यासाठी निकषांची पडताळी केली जाणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटल होतं.

पण आता ही योजनाच अजित पवार स्वत: बंद करतील असा दावाच उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी, अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर रद्द करतील असा दावा केला आहे. तर अर्थसंकल्पात या योजनेबाबत तरतूद केली नसल्याने धोक्यात आल्याचही राऊत यांनी आरोप केला आहे.

दरम्यान आता राज्याच्या तिजोरीवर वाढता भार कमी करण्यासाठी निकषांची कात्री लाडकी बहीण योजनेसाठी वापरली जातेय. ज्यामुळे आता राज्यातील महिला नाराज झाल्या आहेत. तर आता ही योजनाच बंद होणार असा दावा राऊत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवारच या योजनेला टाळं मारतील असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच यावेळी राऊत यांनी सध्या महायुतीच्या नेत्यांची अवस्था ही गरज सरो आणि वैद्य मरो अशी झाल्याची घणाघाती टीकाही राऊत यांनी केली आहे. तर महायुतीचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे काम हे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनावरून मतदारांना फसवायचे, थापेबाजी करायची आहे. याआधी लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या तोंडावर निकाल लागेपर्यंत सरसकट रक्कम दिली. 2100 रूपयांची घोषणा केली.

पण आता महायुतीवाल्यांना लाडक्या बहिणींची गरज नाही. त्यामुळे 2100 सोडाच आता मिळणारे 1500 ही मिळतील का? याची शंका आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूदच केलेली नाही. यामुळे पुढच्या अर्थसंकल्पात ही योजना राहिल का याचीच शंका असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे. तर आता जे निकष लावले जातायेत त्यामुळे किमान 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी वंचित होतील. शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत 2100 चं गाजर दाखवलं जाईल. तर पुढच्या अर्थसंकल्पात अजित पवारच या योजनेला याला टाळं मारतील, असाही दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT