
Mahayuti Government : महायुती सरकारच्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी चांगलचं डिवचलं आहे.
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचा अन् शेतकरी कर्जमाफीचा निर्णयावर महायुती सरकारने घुमजाव केलं आहे. यावरून विरोधकांनी आता महायुती सरकारला डिवचायला सुरवात केली. विनायक राऊत यांनी देखील टायमिंग साधत महायुती सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
विनायक राऊत म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखा (Ajit Pawar) 'खडूस हेडमास्तर' अर्थ खात्याला मिळालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कधीच 2100 रुपये मिळू शकणार नाहीत. त्यांचेच सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची लावलेली विल्हेवाट सांभाळायची असेल तर अजित पवार असल्या फुकट योजनाना प्रोत्साहन देतील असं वाटत नाही". महाराष्ट्रातील भगिनींची निराशा होईल, असं मला या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटतं, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, ते नेहमीच अतृप्त असलेला आत्मा आहे. राजकीय स्वार्थ, सत्तेची खुर्ची जिथे मिळेल तिथे जायचं, मिळालं नाही की अज्ञातवासात जायचं, असा त्यांचा प्रघात आहे, आणि या वेळेला सुद्धा तसेच आहे असे म्हणत डिवचलं आहे.
मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईतील मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवरून भूमिका मांडली. त्यावर बोलताना विनायक राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आहे, ते अनेक घटनांमधून दिसते. त्यामध्ये औरंगजेबाचं थडगं आहे. आम्हाला अभिमान आहे, औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगल साम्राज्याचा निप्पात छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्याचे जे अवशेष आहेत ते, पाहायला मिळत आहेत. इतिहासाची साक्ष देणारी ती घटना आहे. त्यामुळे उखडून टाकण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अशा पद्धतीचे फलक लावून त्याच दर्शन देणं आवश्यक आहे, असे सांगितले.
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ खुप प्रयत्नानंतर सुरू झालं आहे. परंतु सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यकर्ते आहेत, ते एकाच घरातले आहे. संपूर्ण राजकारण एका घरात आलेलं आहे. त्यांना त्याचं काही पडलेलं नाही. केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे, त्याच त्यांना काही पडलेले नाही, त्यांची काम झालेली आहेत, जिल्हा वाऱ्यावर पडला तरी चालेल, असे म्हणत राणे कुटुंबियांची नाव न घेता टीका केली. चिपी विमानतळासाठी मी माझे प्रयत्न चालू ठेवले आहेत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.