Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale design@apglobale.com
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंना पराभव दिसू लागलाय म्हणूनच...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा पालिका ही गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचे कुरण झाले होते. तेथे चरायचं आणि खिसे भरायचे हेच काम त्यांच्या नगरसेवकांचे चालले होते. आता पराभव दिसू लागल्याने इनोव्हेटिव्ह साताऱ्याची योजना उदयनराजेंनी आणली आहे. त्याची मुदत पालिका निवडणूकीसोबतच संपणार आहे. चार, सहा महिन्याची ही योजना पुन्हा गुंडाळली जाईल. त्यामुळे सातारकरांनी अमिषाला बळी न पडता आगामी पाच वर्षे शाश्वत विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ''सातारा पालिकेचे गेल्या पाच वर्षाचे कामकाज सातारकरांनी बघितले आहे. विरोधकांनी आरोप करण्याऐवजी सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक एकमेकांविरोधात बोलत भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आता शेवटच्या टप्प्यात उदयनराजेंनी इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना आणली आहे. निवडणूक जवळ आली की अब्जावधी रूपये सातारच्या विकासासाठी यायला लागले आहेत. हे पैसे पेपरमधूनच येणार आणि पेपरमधूनच परत जाणार आहेत.''

त्यांच्या विकास आघाडीला सातारकरांनी पाच वर्षे संधी देऊनही काहीही विकास झालेला नाही. नगरपालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून तेथे चरायचे आणि खिशे भरायचे हेच काम झाल्याचे दिसत आहे. आता पराभव होणार म्हणून त्यांचे नेते असले काही तरी सोडून देत आहेत. पण, माझे सातारकरांना एकच सांगणे आहे, त्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.

''इकडून योजना आणली, तिकडून योजना आणली व भेटींचे जे फोटो सेशन चालू आहे. याची मुदत पालिकेची निवडणूक आहे. निवडणूक झाली की उदयनराजेच्या इनोव्हेटिव्ह साताऱ्याची मुदत संपतेय. तेवढ्यापुरती चार, सहा महिन्याची ही योजना असून ती गुंडाळली जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षे शाश्वत विकास करणाऱ्याच्या मागे सातारकरांनी उभे राहावे,'' असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

ड्रायव्हरच्या मोबाईलवरून फोन...

उदयनराजेंकडून 'व्हॅलेंटाइन डे' च्या शुभेच्छा देणारा मेसेज तुम्हाला आला का, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''उदयनराजे नेहमी मला त्यांच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवरून फोन करतात. माझ्याकडे त्यांच्या ड्रायव्हरचा ही नंबर नाही. त्यामुळे मला त्यांच्या ड्रायव्हरला 'आय लव्ह यू' चा मेसेज पाठवावा लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT