Ram Shinde | Rohit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Shinde Criticized Rohit Pawar: 'तो' प्रश्न राज्याचा, पण रोहित पवारांनी पंतप्रधानांना पत्र पाठवणे म्हणजे नौटंकी; शिंदेंचा टोला

Karjat-Jamkhed Politics: पाटेगाव-खंडाळा परिसरातील जमीनी निरव मोदी, अग्रवाल, छेडा, खन्ना यांच्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politics : जो प्रश्न राज्याच्या अखत्यारीतील आहे, त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध नाही तरी आ.रोहित पवार हे कर्जत एमआयडीसी विषयी मोदींना पत्र पाठवत आहेत. ही एक त्यांची नौटंकी असून उद्या ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनाही पत्र पाठवू शकतात अशी खोचक टीका आ.राम शिंदे यांनी केली आहे.

नगरमध्ये माध्यमांशी बोलताना आ.रोहित पवारांनी दोन दिवसांपूर्वी कर्जत पोस्ट कार्यालयातून टपालाने पंतप्रधान मोदींना कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी प्रश्नी पत्र पाठवत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यावर आता भाजप आ.राम शिंदे यांनी याला नौटंकी म्हंटले आहे.

पुण्यात मोदी-शरद पवार एकत्र होते. रोहित पवारांना खरंच प्रश्न सोडवायचा असता तर त्यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून मोदींकडे प्रश्न नेला असता. मात्र हा प्रश्न केंद्राचा नाही तर राज्याचा आहे हे पवारांना चांगले माहीत असल्याने पत्र पाठवण्याची नौटंकी रोहित पवारांनी केल्याची टीका आ.राम शिंदे यांनी केली आहे

पाटेगाव-खंडाळा परिसरातील जमीनी निरव मोदी, अग्रवाल, छेडा, खन्ना यांच्या आहेत. मात्र त्या असमतोल आहे. तरीही उद्या या जमिनी एमआयडीसी साठी घेतल्या तर पैसे द्यायचे कुणाला असा प्रश्न आ.राम शिंदे यांनी उपस्थित करत रोहित पवारांकडे निरव मोदींची 'पॉवर ऑफ अटर्नी' आहे का असा प्रश्न उपस्थित केला काहे. या जमिनी घेण्यासाठी कुणाचा अट्टाहास आहे असाही प्रश्न आ.शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT