Jaya Prada Jail : चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री-माजी खासदार जया प्रदा यांची ६ महिने तुरूंगात होणार रवानगी!

Jaya Prada News : जया प्रदा यांनी आरोप मान्य करत, खटला रद्दल करण्याची विनंती केली होती.
Jaya Prada Jail :
Jaya Prada Jail :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Chennai News : हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री आणि माजी खासदार राहिलेल्या जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने सहा महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आपल्या मालकीच्या थिएटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयचे पैसे न दिल्याचा आरोप जयाप्रदा यांच्यावर होता. (Latest Marathi News)

Jaya Prada Jail :
Rahul Gandhi On Narendra Modi : पेटलेल्या मणिपूरवर मोदी निर्लज्जपणे हसत राहिले; राहुल गांधी भडकले

'लेबर गव्हर्नमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ ने चेन्नई येथील एग्मोर मॅजिस्ट्रेट कोर्टात जया प्रदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला होता. या खटल्यात न्यायालयाने जया प्रदा यांना दोषी ठरवून, त्यांना शिक्षा सुनावली आहे. ज्यामुळे जया प्रदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

याप्रकरणी अभिनेत्री जयाप्रदा यांच्यासोबतच राम कुमार आणि राजा बाबू यांना देखील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जया प्रदा यांचं चेन्नई या ठिकाणी एक थिएटर होतं. पण त्यांचं थिएटर आता बंद पडलं आहे. थिएटर बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जया प्रदा याच्या विरोधात आवाज उठवला. याबाबत थिएटर कर्मचारी म्हणाले, 'जया प्रदा यांनी मानधनात कपात केली आणि ईएसआईचे पैसे दिलेच नाहीत. ज्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.' ईएसआयचे पैसे सरकारी विमा महामंडळाला दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Jaya Prada Jail :
Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

सध्या जया प्रदा अडचणीत सापडल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जया प्रदा यांनी आरोप मान्य करत, खटला रद्दल करण्याची विनंती केली होती. संबंधित प्रकरण कोर्टात गेल्यानंतर थकलेली रक्कम परत देण्याचे आश्वासनही जया प्रदा यांनी दिलं, पण जया प्रदा यांची मागणी फेटाळत, त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या सर्वत्र जया प्रदा यांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.