Ajit Pawar, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : अजितदादांचे 'ते' वक्तव्य कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्यासाठीच... शंभूराज देसाई

शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले, विकास कामांबाबत मुख्यमंत्रीCM, उपमुख्यमंत्री DyCM यांनी विधानसभेत अजित दादा Ajit Pawar असताना विकास कामांचा पाढा वाचला आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चलबिचल होऊ नयेत म्हणून त्यांना मानसिक आधार देण्याच्या प्रयत्नातूनच अजित दादांनी आम्ही कधीही सत्तेत येऊ. अधिकाऱ्यांनो दबाव घेऊन काम करू नका असे वक्तव्य केले असेल, अशी टीका राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

मंत्री देसाई यांनी आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही कधीही सत्तेत येऊ शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनो दबाव घेऊन काम करू नका, असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं होते. याविषयी शंभूराज देसाईंना विचारले असता ते म्हणाले, कदाचित त्यांच्या काळात अधिकाऱ्यांवर दबाव असेल. त्यांच्या अनुभवावरून ते बोलत असतील. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांना सांगितले असेल.

मुळात सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी वगळता सगळे जुनेच अधिकारी आहेत. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केले आहे. पालकमंत्री म्हणून काम करण्याची माझी पध्दत सगळयांना माहिती आहे. सगळ्यांना विश्वासात व सोबत घेऊन काम करतो. दादांनी कदाचित समोर बसलेल्या राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांत चलबिचल होऊ नयेत. यातूनच आम्ही पुन्हा येणार आहे, असे सांगून त्यांना मानसिक आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न केला असेल, अशी टीका त्यांनी केली.

९० दिवस झाले तरी विकास कामे झालेली नाहीत, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, विकास कामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत अजित दादा असताना विकास कामांचा पाढा वाचला आहे. जिल्ह्यातील कामांचा शंभर दिवसांचा पाढा मी वाचेन त्यांच्यापेक्षा जास्त कामे या शंभर दिवसांत आम्ही केली आहेत.

दसरा मेळाव्यात शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसने बॅनरबाजी सुरू केली आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, गेली अडीच वर्षे चालले होते, तेच पुढे चालले आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे साहेबांवर ही वेळ आली आहे. त्यात अजूनही बदल झालेला नाही. बॅनर लावून पाठींबा देण्याचा प्रयत्न चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून चालूच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT