गोवा दारू तष्करीप्रकरणी 'मोका' लावण्याचा प्रयत्न करणार... मंत्री देसाई

ईडीची कारवाई Action by ED संदर्भात होणाऱ्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले, ईडीची कारवाई चुकीची असती तर न्यायालयाने Court हस्तक्षेप करून तो गुन्हा रद्दबातल ठरवला असता.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

सातारा : दारू तष्करीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीचे आर्थिक नुकसान कोणी करणार असेल तर गृह विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्यावर संयुक्त कारवाई करेल. परराज्यातून सातत्याने गोवा दारू तष्करीचा प्रयत्न केल्यास त्याला मोका लावण्याचा प्रस्ताव आमच्या विभागाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

सातारा शासकिय विश्रामगृहात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रात विक्री करण्याच्या टोळीत कोण कोण आहे, याचा अहवाल आम्ही संबंधित अधीक्षकांकडून मागविला आहे. दोन, तीन व्यक्ती येऊन असा प्रकार करत असतील तर त्यांच्यावर मोका लावण्याचे प्रयोजन आहे. आमच्या विभागाला 'मोका'चा अधिकार नसला तरी आमचे एसपी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवू शकतात.

Shambhuraj Desai
Shivsena : मुळची शिवसेना आमचीच; 'धनुष्यबाण'ही आम्हालाच मिळेल : शंभूराज देसाई

सचिन सावंतांनी देसाईंना 'मोका' कायद्याचा अर्थ कळतो का, अशी टीका केली आहे. यावर मंत्री देसाई म्हणाले, माझा व्हिडीओ सचिन सावंतांनी निट ऐकावा. गोवा बनवाटीची दारू जादा दराने विक्री केली जाते. त्यावेळी राज्याचे उत्पन्न घटून राज्याची आर्थिक हानी होते. राज्याच्या तिजोरीचा पैसा इतर राज्याच्या तिजोरीत जात असेल तर त्याला काँग्रेसच्या सचिन सावंताचे समर्थन आहे का, असा प्रश्न त्यांनी सावंतांना केला.

Shambhuraj Desai
फडणवीस सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कसं पेलवणार..? पण त्यांना माझ्या शुभेच्छा : अजित पवार

लवकरच परराज्यातील दारू तष्करीवर अंकुश ठेवण्यासाठी तात्पुरते दहा तपासणी नाके उभे केले जातील. त्यासाठीचा प्रस्ताव आमच्या आयुक्त कार्यालयास पाठविण्याची सूचना केली आहे. तसेच भरारी पथकांची संख्या वाढवून आणखी अधिकारी दिले जातील. गोवा राज्यातून होणारी दारू तष्कारी मोठ्याप्रमाणात मोहिम राबवून रोखली जाईल, असे त्यांनी सांगितले. ईडीची कारवाई संदर्भात होणाऱ्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, ईडीची कारवाई चुकीची असती तर न्यायालयाने हस्तक्षेप करून तो गुन्हा रद्दबातल ठरवला असता. हा विषय जरी केंद्र शासनाच्या अखत्यारित असला तरी ईडीचा कोणीही गैरवापर करत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com