Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale design@apglobale.com
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंचे टेन्शन गेले, शिवेंद्रसिंहराजेंसह सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध

पुण्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केल्यानंतर झाला निर्णय

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा ः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या खलबतांनंतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व साताराचे आमदार व विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेअंती अखेर उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशकमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक सोपी झाली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघातून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने तीन उमेदवार दिले होते. मुळात राष्ट्रवादीच्या सर्वसामावेशक पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सामावून घेण्याबाबत गेल्या महिनाभरापासून चर्चेच्या फेऱ्याच सुरू होत्या. त्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोध असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्व जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. पुण्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्यास हिरवा कंदील दिला.

त्यानुसार आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उदयनराजेंच्या विरोधात दाखल सर्व अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे ते बिनविरोध झाले. तसेच सातारा सोसायटी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधातील अर्ज ही मागे घेतल्याने तेही बिनविरोध झाले. उदयनराजेंनी त्यांना राष्ट्रवादीने त्यांच्या पॅनेलमध्ये घ्यावे, यासाठी सर्व प्रकारचे दबावतंत्र अवलंबले. जिल्हा बँकेच्या कारभारावरही टीका केली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही टीका केली. पण, शिवेंद्रसिंहराजेंनी अखेरच्या क्षणापर्यंत विरोधाची भूमिका घेतली.

शेवटी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यस्थाची भूमिका घेते, दोघांत समेट घडविला. त्यामुळे उदयनराजे बिनविरोध संचालक झाले. तसेच शिवेंद्रसिंहराजेही बिनविरोध झाले. दोन्ही राजे जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याने साताऱ्यातील दोघांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेसह सातारा शहरात फटक्याची आतषबाजी करत आनंदोत्सवा साजरा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT