उदयनराजे गृहनिर्माणमधून लढणार; सभासदांवर अन्याय करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

उदयनराजे स्वतःच्या एकटयाच्या मतावर निवडुन येऊ शकत नाहीत, हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : जिल्हा बॅंक सहकारातील अग्रगण्य बॅंक असून येथे फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरे वाटते, म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बॅंकेच्या माध्यमातून हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या इच्छेनुसार याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यास भरभरुन आशीर्वाद दयावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

दरम्यान, सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजुला पडला असून, शेतक-यांपेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही. त्यांचा बंदोबस्त करु, असा घणाघात त्यांनी केला आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदारसंघातील मतदार सभासद-कार्यकर्त्यांचा मेळावा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजिला होता.

Udayanraje Bhosale
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, गितांजली कदम, कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, महाबळेश्‍वरचे माजी सभापती विजयराव भिलारे, प्रा.आर.के.पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, रत्नमाला निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले मत महत्वाचे आहेच कारण उदयनराजे स्वतःच्या एकटयाच्या मतावर निवडुन येऊ शकत नाहीत, हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले.

Udayanraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या वादात रामराजेंची मध्यस्थी...

या वेळी राजेंद्रसिंह यादव, विजयराव भिलारे, भरत पाटील यांनी मनोगतात सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळावर असलेच पाहिजेत, असे मत मांडले. शिरिष चिटणीस यांनी सुत्रसंचालन केले. या वेळी काका धुमाळ, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, सुनील काटकर, सुनील सावंत, डॉ. महेश गुरव, फिरोज शेख, अ‍ॅड.विनित पाटील, अ‍ॅड.अंकुश जाधव, अ‍ॅड.विकास पवार, रणजित माने, संग्राम बर्गे, चंद्रकांत भोसले, बाळासाहेब राक्षे, लक्ष्मण कडव, जयवंत पवार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com