Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : विखेंनी बॅंक ताब्यात घेतली; मतदान झाल्यावरच बिंग फुटले : थोरातांना धक्का देणारे चारजण कोण?

Balasaheb Thorat News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री भाजप नेते शिवाजी कर्डिले यांची निवड झाली.

सरकारनामा ब्यूरो

Nagar District Bank News Election : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री भाजप (BJP) नेते शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. रात्रीत घडलेल्या घडामोडीनंतर भाजपने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) हातातील जिल्हा बँक ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

जिल्हा बँकेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संचालकांची बैठक मंगळवारी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उद्या सकाळी अध्यक्ष पदाचे नाव फायनल केले जाईल, असे पवार यांनी सांगितले होते. बैठकीला आशुतोष काळे, चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे आदी संचालक उपस्थित होते.

सर्व संचालक मंडळाशी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली होती. अध्यक्षपदाबाबत संचालकांची मते जाणून घेतल्यानंतर आज माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव फायनल झाले. ते अध्यक्षपदासाठी निवडून येणार असे जवळपास निश्चित असताना आघाडीची मते फुटली आणि शिवाजी कर्डिले अध्यक्ष झाले. मंगळवारच्या बैठकीला सर्व संचालक उपस्थित होते. त्यामुळे अध्यक्ष आपलाच होणार असा विश्वास महाविकास आघाडीला होता. मात्र, रात्रीत गणित बदलली आणि आघाडीची चार मते फुटली. आता आघाडीला धक्का देणार हे चारजण कोण आहेत, अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

निवडणुकीत कर्डिले यांना 10 मते मिळाली, तर घुले यांना 9 मते मिळाली. एक मत बात झाले. त्यानुसार कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जिल्हा सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेशपुरी यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीचे 14 संचालक होते. तर भाजपचे चार आणि त्यांना माननारे दोन असे एकून सहा संचालक होते. महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मते पडली. त्यामुळे आघाडीची चार मते फुटली. या मतांमुळे कर्डिले यांचा विजय झाला.

अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीनंतर सूत्र फिरली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यानंतर निवडणूक लढवण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आणि महाविकास आघाडीला थांगपत्ता लागण्याच्या आतच भाजपने भाजपने बाजी मारली. थेट निवडणूक झाल्यावरच आघाडीची मते फुटली हे कळले. त्यामुळे नेमके काय होणार आहे, हे आघाडीला कळलेच नाही, असे जाणकार सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT