Nitish Kumar, Chandrakant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BJP News : विरोधकांच्या वज्रमुठीला तडे; सर्वसामान्‍य जनता मोदींसोबतच : चंद्रकांत पाटील

Umesh Bambare-Patil

Satara BJP News : देशाची सत्ता २०१४ मध्‍ये नरेंद्र मोदी यांनी मिळवली. त्यापूर्वीच्या काळात घोटाळ्यांच्‍या आकड्यांनी सर्वसामान्‍य माणसे अस्‍वस्‍थ होत होती. सत्ता मिळवल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्‍य माणसांना केंद्रस्‍थानी मानत अनेक लोककल्‍याणकारी योजना राबवल्‍या.या योजनांमुळे सर्वसामान्‍य माणसांचे जीवनमान उंचावल्याने आज सर्वसामान्‍य जनता मोदींसोबत असताना विरोधकांच्या वज्रमुठीला तडे जात असल्याची टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्‍या कार्यकाळाचे ९ वर्षे पूर्ण झाल्याच्‍या निमित्ताने आयोजित मोदी ॲट ९ या कार्यक्रमांतर्गत सातारा येथे मेळाव्‍यात चंद्रकांत पाटील Chandrakant Patil बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, अ‍ॅड. भरत पाटील, सुवर्णा पाटील, डॉ. प्रिया शिंदे, विक्रम पावसकर आदी प्रमुख उपस्‍थित होते.

श्री. पाटील म्‍हणाले, २०१४ पूर्वी देश भ्रष्‍टाचाराने पोखरला होता. दररोज लाखो, करोडोंच्‍या घोटाळ्यांचे आकडे बाहेर येत होते. याच काळात भाजपाच्‍या माध्यमातून गुजरातचे मुख्‍यमंत्री म्‍हणून कार्यरत असणारे नरेंद्र मोदी यांचा पर्याय पुढे आला. सलग दोन निवडणुकांमध्ये देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्‍या हातात देण्‍याची किमया देशातील जनतेने केली.

कोविडच्या काळात भाजपने देशातील संकट परतवून लावले. सद्यःस्थितीत विरोधक पाटण्‍यात संयुक्‍त मोर्चाची बांधणी करण्‍यासाठी एकवटले असताना त्‍यांच्‍यातील आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रक काढत एका मुद्द्यावर काँग्रेसला प्रश्‍‍न विचारला.

त्यामुळे विरोधकांचा समन्वय नसल्याने कोणी कितीही एकत्र आले, तरी सर्वसामान्‍य जनता मोदींसोबत आहे. देशात संयुक्‍त मोर्चाचा प्रयोग आणि राज्‍यात हेच सुरू आहे. वज्रमुठीचा प्रयोग सुरू आहे. वज्रमुठीला तडे गेलेत. प्रत्‍येकजण आपापले पक्ष वाचविण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT