Dharampur Police Station: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत येथे जात असताना सोमवारी नाशिक शहर- जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांना दिवसभर धरमपुर (गुजरात) पोलीसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात ठेवले. त्यामुळे गुजरात सरकारच्या दडपशाहीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. (Youth Congress supporters detain at Dharampur police station)
राहुल गांधींना (Rahul Gandhi) पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील कॉंग्रेसच्या (Congress) बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या (Gujrat) दिशेने रवाना झाले. मात्र, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) रस्त्यातच अडवत अटक केली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये नाशिकच्या (Nashik) कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
नाशिकच्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवले. त्यानंतर त्यांना अटक करत धरमपुर पोलीस ठाणे (वलसाड) येथे ठेवण्यात आले. यामध्ये पाटील यांच्यासह पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण, मध्य विधानसभा अध्यक्ष जयेश सोनवणे, वकील सेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. कोनिक कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कोठूळे आदींचा समावेश आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते. पण सुरत शहर व आपसासच्या परिसरात भाजप सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये, यासाठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणारे काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.