Private train to Shirdi
Private train to Shirdi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन पोचली शिर्डीत

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - देशातील अनेक शासकीय क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे विमा क्षेत्रा पासून सैन्यक्षेत्रापर्यंत खासगी उद्योगक्षेत्र पोचले आहे. यात आता भारतीय रेल्वेचाही समावेश आहे. भारतीय रेल्वेची पहिली खासगी प्रवासी ट्रेन कोईम्बतूरमधून निघाली होती. ही ट्रेन आज शिर्डीत पोचली. ही ट्रेन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ( The country's first private passenger train reached Shirdi )

भारत गौरव योजने अंतर्गत देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन गुरुवारी सकाळी शिर्डीत दाखल झाली. या ट्रेनला मंगळवारी ( ता. 14 ) कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वे सेवेअंतर्गत खासगी ट्रेन प्रथमच धावली आहे. या पहिल्या खासगी रेल्वेत 810 प्रवासी होते. शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोहचताच ग्रामस्थांनी प्रवाशांच स्वागत केले.

रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांसाठी कराराने दिली आहे. ही ट्रेन चालविणार्‍या कंपनीने कोचमध्ये नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप केल्या जाणार आहेत. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल. ट्रेनमध्ये फ्लेमलेस किचनची व्यवस्था असुन यात फक्त शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वे पोलीस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी 24 तास सेवेत असणार आहेत.

नेहमीच्या रेल्वेपेक्षी या खासगी ट्रेनचे प्रवास भाडे थोडे जास्त असले तरी सुविधा मिळत असल्याने प्रवाशांनी खासगी रेल्वेला पसंती दर्शवली आहे. भारतीय रेल्वे खाजगी ट्रेनच्या माध्यमातून उच्च प्रतीची सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिल्या ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्याने पुढील काळात आणखी खासगी रेल्वे धावल्यास त्यात नवल वाटायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT