नगर-शिर्डी रस्त्या लगतच्या चरात शिक्षिकेचा मृत्यू : नेते या मृत्यूची जबाबदारी घेणार का?

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी 'महाविकास आघाडीचा लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी टक्केवारी मागत असल्याने ठेकेदार निघून गेला', असा आरोप केला होता.
Nagar-Shirdi road Accident
Nagar-Shirdi road AccidentSarkarnama
Published on
Updated on

कोल्हार ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर ते शिर्डी या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले त्यांनेही हे काम अर्ध्यावर सोडून पलायन केले आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी 'महाविकास आघाडीचा लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी टक्केवारी मागत असल्याने ठेकेदार निघून गेला', असा आरोप केला होता. या राष्ट्रीय महामार्गा लगतच्या चरामुळे एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मृत्यूची राजकीय नेते मंडळी जबाबदारी घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ( Teacher's death near Nagar-Shirdi road: Will the leader take responsibility for this death? )

रयत शिक्षण संस्थेच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील उपशिक्षिका उषा यशवंत शेंडे ( वय 54 ) यांचा तोल गेल्याने चरात पडून जागीच मृत्यू झाला. नगर-शिर्डी राष्ट्रीय मार्गा लगत शाळेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

Nagar-Shirdi road Accident
पंकजा मुंडेंना दूर सारत भाजपने राम शिंदेंना पुढे नेले : भाजप कार्यकर्त्यांत कही खुशी कही गम

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सध्या शाळेला सुट्टी आहे. मात्र दहावीचे उन्हाळी वर्गाचे जादा तास घेण्यासाठी शिक्षिका शेंडे आज सकाळी शाळेत आल्या होत्या. तास संपल्यावर सर्व विद्यार्थी घरी निघून गेल्यानंतर शेंडे याही घरी जाण्यासाठी पायी निघाल्या. दरम्यान तोल जाऊन त्या शाळेच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या खोदलेल्या चरात पडल्या. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडून गेल्यावर अर्धा ते पाऊण तासाने हा प्रकार लक्षात आला. त्यांना बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Nagar-Shirdi road Accident
बाळासाहेब थोरातांच्या घरात कोणाशी बोलायचे हा माझ्यासमोर प्रश्न

चरातील साचलेले पाण्याचे डबके आणि त्यात वाढलेली दाट झुडुपे त्यामुळे शेंडे पडल्याचे लवकर कुणाच्याच आले नाही. त्या येथील शाळेत उपशिक्षिका होत्या. त्या मराठी विषय शिकवित असायच्या. मूळच्या तांबेवाडी ( ता. श्रीरामपूर ) येथील रहिवाशी शेंडे या सध्या येथील लक्ष्मीबाई कुंकुलोळ कॉम्प्लेक्समध्ये रहात होत्या. त्यांना शाळेतून नेण्यासाठी त्यांचे पती येत असायचे. शेंडे यांच्यामागे एक विवाहित मुलगी आहे. त्यांच्या या आकस्मिक मृत्युमुळे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ऍड. सुरेंद्र खर्डे, तसेच रयत सेवक परिवार व तांबेवाडी गावकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे. लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com