Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

gram panchayat : कर्नाटक सीमेजवळील गावात शिंदे गटाला धक्का; मंत्र्यांनी प्रचार करुनही दारूण पराभव

gram panchayat election result : कर्नाटक सीमेवरील शेनोळी गावात शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे

सरकारनामा ब्यूरो

gram panchayat election result : राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती येत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रस्थापीतांना धक्का देत तरुणांना संधी दिली आहे.

कर्नाटक सीमेवरील शेनोळी गावात शिंदे गटाला धक्का बसला आहे. या गावात शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रचार केला होता. त्यांनी येथे सभाही घेतली होती. त्या सभेची राज्यभरात चर्चा झाली होती. परंतु, या ठिकाणी नऊपैकी सात जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाल्या आहेत.

त्यामुळे शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. देसाई यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करूनही शिंदे गटाला धक्का बसल्याने याची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळीमध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवून टाकली. शिनोळी गाव बेळगावला लागून आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीर भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आता पर्यंत एक हजार निवडणुकांपैकी भाजपाला ५०१ जागा मिळाल्या आहेत. २५० जागा शिंदे गटाच्या आल्या आहेत आणि बाकी इतर आहेत. मात्र, कॉंग्रेसची परिस्थिती वाईट आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे, महारष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस सरकारचे प्रतिबिंब उमटले आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT