<div class="paragraphs"><p>Dhananjay munde</p></div>

Dhananjay munde

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

निवडणूक आयोग केंद्राची हस्तक म्हणून काम करत आहे

Amit Awari

अहमदनगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde )राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी मोठी सभा आज कर्जतमध्ये झाली. या सभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप व राम शिंदे यांच्यावर टीका केली. The Election Commission is working for the Central Government

धनंजय मुंडे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आले आणि ओबीसींचे आरक्षण गेले असे ते म्हणतात. न्यायालयीन प्रक्रिया एका दिवसात होत नाही. त्यांनी चुका केल्या आणि नेमके आमच्याकडे सत्ता आल्यावर निकाल आला. टीका करणाऱ्यांना महाराष्ट्राचे राजकारण माहिती आहे का. ते मंडल आयोगाच्या वेळी कमंडलचे राजकारण करत होते. त्यावेळी महाराष्ट्राने मंडल आयोग जशाच्या तसा स्वीकारला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

मंत्री मुंडे पुढे म्हणाले, चुका त्यांनी करायच्या आणि खापर आमच्यावर फोडायचे असा प्रकार सध्या सुरू आहे. केंद्राच्या इम्पिरिकल डाटाच्या एका कागदावर ओबीसी आरक्षण मिळू शकते. पण तो कागद दिला जात नाही. आम्ही मंत्री मंडळाची बैठक घेऊन ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटे पर्यंत तुकड्या तुकड्यात निवडणुका घ्यायला विरोध दर्शविला. ही बाब निवडणूक आयोगाला कळविली. निवडणूक आयोग केंद्राची हस्तक म्हणून काम करत आहे. ईडी अवस्था दयनिय झाली आहे. ईडीला मजुराच्या बिडी एवढीही किंमत राहिलेली नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

रोहित पवारांनी मतदार संघात जादू केली आहे. 20 वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात रोहित पवार येताच आमदार झाले. नगरपंचायतची एक जागा बिनविरोध झाली. 12 खात्यांच्या मंत्र्याला पराभवाची चव चाखविली. 30 वर्षांचा विकासाचा अनुशेष दोन वर्षांत भरून काढला, हा रोहित पवार यांचा चमत्कार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT