Kolhapur News : कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघावर नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर राजकीय घडामोडी शांत झाल्या. संघावर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप केला. त्याप्रमाणे संघावर महायुतीचा अध्यक्ष झाला. पण स्थानिक स्तरावर शाहू आघाडीचा अध्यक्ष झाला असा दावा करण्यात येतोय. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हाच घोळ कायम राहणार आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पुढच्या निवडणुकीत आपल्या सोबत राहतील असा दावा केला आहे. शिवाय महायुती म्हणून मुश्रीफ यांच्यावर दबाव आहे. सध्याची परिस्थिती पाहता गोकुळचे नियंत्रण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे आहे. गेल्या चार वर्षात गोकुळ दूध संघात जवळपास 1800 सभासदांची नव्याने वाढ झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत महायुती एकत्र लढण्याची चिन्हे आहेत. सध्या गोकुळवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्र सत्ता आहे. त्यामुळे हे दोघे विभागले तर या वाढीव सभासदांचा नेता नेमका कोण? यावरून आता घमसान होण्याची शक्यता आहे.
सध्या गोकुळ दूध संघावर महायुतीमधील प्रमुख नेते आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एकत्र सत्ता आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके त्यांच्यासह काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची सत्ता आहे. पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे. या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवावी असा आग्रह महाडिक गटाचा आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या वर्षी महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी गोकुळच्या राजकारणात लक्ष घातले. गोकुळचा अध्यक्ष पदाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर गोकुळचे राजकारण पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने तापले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आत्तापासूनच आकडेमोड सुरू आहे. ठरावांची जमवाजमव करण्यासाठी आतापासूनच धावपळ सुरू आहे. गेल्या चार वर्षात गोकुळ दूध संघात जवळपास 1800 सभासद नव्याने वाढले आहेत. मागील निवडणुकीत सभासदांची संख्या 3 हजार 569 इतकी होती. पाच वर्षात यात सभासदांची संख्या 5 हजार 470 वर गेली आहे. वाढवण्यात आलेले 550 सभासद गेल्या संचालक मंडळाने मंजूर केले आहेत.
त्यामुळे यंदा ते सभासद मतदानास पात्र आहेत. सभासद वाढवण्यासाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पाटील हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वात काम करतात तर डोंगळे महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात काम करत आहेत.
नव्या संचालक मंडळात 1225 सभासदांना संचालक मंडळांने मंजूर केले आहेत. त्यामुळे दोन्ही आघाडीच्या नेतृत्वांचा देखील यामध्ये कमी जास्त वाटा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सभासद कोणाच्या नेतृत्वाखाली विभागले जाणार याची चर्चा अधिक रंगली आहे. या सभासदांचा नेता कोण असणार हे आगामी गोकुळच्या निवडणुकीत होणाऱ्या आघाडीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.