Gokul Politics : धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना विचारलेल्या चार प्रश्नांना ठोस उत्तरं मिळाली, 'गोकुळ'चा लेखाजोखाच मांडला

Dhananjay Mahadik Vs Satej Patil : 2019 ला गोकूळच्या किती ठेवी होत्या? 2025 साली किती ठेवी आहेत? असे प्रश्न धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना विचारले होते.
Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Satej Pati Vs Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Gokul Administration : गोकुळ मधील घडलेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. टीका करत असताना महाडिक यांनी गोकूळ विषयी चार प्रश्न सतेज पाटलांना विचारले होते. या प्रश्नामुळे सतेज पाटलांची अडचण वाढण्याची चर्चा होती. मात्र, या प्रश्नांना गोकुळ प्रशासनानेच ठोस उत्तरं दिली आहेत.

महाडिक यांनी विचारलेल्या प्रश्नावर गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी महाडिक यांनी गोकुळ दूध संघाची मागील चार वर्षांपासूनची वाटचाल ही पारदर्शक आणि आर्थिक फायद्याची आहे, असे सांगितले. तसेच संघाकडे यावर्षी 512 कोटींच्या ठेवी असल्याचा खुलासा गोडबोले यांनी केला आहे.

गेल्या चार वर्षात गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देत दूध दरात 11 रुपयांची वाढ केली. तर दूध संकलन 15.94 लाख लिटर इतके झाले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी 'गोकूळ'च्या प्रसिद्धीपत्रकातून दिले.

पत्रकात म्हटले आहे, ‘गोकुळ’ हे विश्वासाचे प्रतीक आहे. मार्च 2021 मध्ये गोकुळ दूध संघाकडे ३२२ कोटींच्‍या ठेवी होत्या. संघाचे विविध धोरणात्मक निर्णय, पारदर्शक कारभार व उत्पादकभिमुख कार्यपद्धती यामुळे ठेवींमध्ये 190 कोटींची वाढ झाली. 31 मार्च 2025 अखेर संघाकडे 512 कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Cyber theft case : बायको सरपंच, वडील तालुका उपाध्यक्ष... राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निघाला सराईत सायबर चोरटा

वासाचे अथवा भेसळयुक्त दूध हे बाजारात विक्रीस पुन्हा येऊ नये, म्हणून नष्ट करणे बंधनकारक आहे. मात्र, गोकुळने वासाच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये व वासाच्या म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ दिली.

उच्चांकी दर दिला...

गेल्या चार वर्षांत गोकुळने उत्पादकांना उच्चांकी दूध दर तसेच अंतिम दूध दर फरक दिले. गेल्या वर्षी प्रतिदिनी 18.50 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला. म्हशीच्या दूध दरामध्ये सरासरी 12 रुपये प्रतिलिटर वाढ, तर गाय दुधाच्या दरामध्ये सरासरी 9 रुपये प्रतिलिटर वाढ केली. प्रतिस्पर्धी दूध संघांनी दूध विक्री दरात वाढ केल्यानंतर संघालाही विक्री दरात वाढ करावी लागते. या दरवाढीसाठी व्यवसायिक दृष्‍टिकोन ठेवून दुधाच्या खरेदी व विक्री दरातही वाढ होत असते. गोकुळला दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्था सहकारी संस्था कायद्यानुसार नोंदणी करून सभासद होतात, असे देखील प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

धनंजय महाडिक विचारलेले प्रश्न

-2019 ला गोकूळच्या किती ठेवी होत्या? 2025 साली किती ठेवी आहेत?

-चार वर्षात किती वासाचं दुध शेतकऱ्यांना परत दिलं?

-2019-2020 च्या निवडणूकीवेळी 3600 दूध संस्था होत्या.आता काहीतरी 5,500 दूधसंस्था झाल्या. या वाढीव दूध संस्थांच्या माध्यमातून किती दुध संकलन होतयं?

-ग्राहकांच्यावर बोजा टाकून त्यांच्याकडूंन वसुल करुनच शेतकऱ्यांना दूध दर देत आहेत. हे खरं आहे की,खोटं आहे?

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Bharat Gogawale : सूर नरमला नाही तर गोगावलेंकडून थेट सीमोल्लंघनाची भाषा; तटकरेंवर तुटून पडत म्हणाले, 'आता महायुती नाही युती...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com