Shivsena UBT Vs MNS Dispute Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Shivsena UBT Vs MNS : ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद; मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड

Rahul Gadkar

Kolhapur News, 10 August : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाण्यात मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी शेण, बांगड्या आणि नारळ फेकल्याची घटना घडली. या घटनेमुळे मुंबईसह राज्यातील शिवसैनिक संतप्त झाले असून आता मनसे विरुद्ध ठाकरे गट असा वाद निर्माण झाला आहे.

अशातच ता उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील नारळ नारळ आणि शेण फेकीचे पडसाद आता कोल्हापुरात उमटले आहेत. शनिवारी रात्री कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण शाखा फलकांना काळे फासत तोडफोड केली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय या घटनेमुळे आता पुढच्या काळात कोल्हापूर (Kolhapur) शहरातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन'

बीडमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ( ठाकरे गट ) पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. ठाकरे गटाकडून राज यांच्या गाडीवरील सुपारी फेकण्याची घटना पक्षाची निगडीत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं

मात्र, तरीही काल रात्री उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसैनिकांनी केलेल्या नारळ आणि शेण फेकीमुळे मुंईसह राज्यभरात मनसे विरुद्ध ठाकरे गट वाद सुरु झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT