महेश माळवे
श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे खासदार लोखंडे यांना आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे. ही इन्कमिंग खासदार लोखंडे यांची डोकेदुखी ठरु शकते, अशी चर्चा अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे. ( The incoming MP from Shiv Sena in Srirampur will be a headache for Lokhande )
राज्यात शिवसेना व शिंदे गटात संघर्ष सुरू असून आमदार खासदारानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये शिंदे गटात सामील होण्याची एकीकडे स्पर्धा सुरू असताना श्रीरामपुरात मात्र या उलट चित्र आहे. यासर्व राजकीय धुराळ्यात शहर प्रमुख सचिन बडदे यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेकडो शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेतून आउटगोईंग सुरू असताना श्रीरामपुरात सुरू असलेले इन्कमिंग खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू पहात आहे.
राज्यात शिवसेना व शिंदे गटात दिवसागणिक संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनीही शिंदे गटाशी घरोबा केला आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हेही अपवाद ठरले नाहीत. मात्र, लोखंडे यांचे निवासस्थान उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथे असल्याने श्रीरामपुरात येताना त्यांना यापुढील काळात काळजी घ्यावी लागणार आहे. लोखंडे यांनी शिंदे गटाशी हात मिळवणी केल्याने शिवसैनिकांमध्ये रोष दिसत आहे. वरिष्ठ पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नसल्याने शिवसैनिक शांत आहेत. येत्या दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर याप्रकरणी हालचाली होणार असल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेना शहर प्रमुख बडदे, यासीन सय्यद, राहुल रणधीर, रोहित भोसले, निखिल पवार, शारदा कदम, राम अग्रवाल, राधाकिसन बोरकर, आबा बिरारी, प्रवीण शिंदे, सागर हरके, रामपाल पांडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवित प्रतिज्ञापत्र सादर केली. तसेच राहुल डुकरे, अजित गुंजाळ, श्रीकांत गुंजाल, आकाश गुंजाळ, गणू गुंजाळ, लखन धोत्रे, गोरख साळवे, शुभम आलगुडे, रवी गुंजाळ, संतोष गुंजाळ, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, रंजथ मांजरे, विशाल साळवे, विजय धोत्रे, दीपक धोत्रे, अतुल गुंजाळ, सचिन धोत्रे, सुनील धोत्रे, अक्षय गुंजाळ, मयुर गुंजाळ, नितीन गुंजाळ आदींसह शेकडो जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आदित्य ठाकरे आज (ता. 23) शिर्डीला येणार आहेत. यावेळी ते नेवासेहून शिर्डीकडे जात असताना दुपारी चार वाजता शिवसैनिकांकडून श्रीरामपुरात महात्मा गांधी चौकात स्वागत करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.