सातारा : माझ्या महसूल राज्यमंत्री पदाच्या काळात, तत्कालिन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान, सत्तापालट झाला. जनतेच्या दुर्दैवाने, श्रेयवादामधुन ही योजना चांगली असुनही बासनात गुंडाळली गेली. त्यामुळे या योजनेच्या पाण्यापासून नागरीक सुमारे 20 वर्षे वंचित राहिले. याची खंत आणि क्लेश जरुर आहे, अशी टीका सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर केली.
शाहुपूरी २४ बाय सात या योजनाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय पाटील, अॅड. डि. जी. बनकर, नगरसेवक वसंत लेवे, बाळासाहेब ढेकणे, तत्कालिन शाहुपूरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, यांचेसह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा ही योजना मार्गी लागली असती तर केवळ 16 कोटी रुपये अंदाज पत्रकीय रक्कमेत शाहूपुरी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पूर्वेकडील वसाहतीसह योजनेतील मार्गावरील एकूण 18 गांवांतील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा उपलब्ध झाला असता. 1999 नंतर सत्ताबदल झाला. आम्ही आमदार म्हणून राहिलो नाही. अनेक विनंत्या-आर्जव करुन देखील केवळ आम्हाला श्रेय मिळेल, या संकुचित हेतुने एक चांगली पाण्याची सुविधा देणारी योजना अडगळीत टाकण्यात आली.
आजच्या शाहूपुरी 24 बाय 7 योजनेमधुन शाहूपुरी आणि काहीसा करंजेमधील सुमारे 10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या भागाकरीता प्रथम ३१ कोटी आणि नंतर वाढीव अंदाजपत्रकानुसार सुमारे 42 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. निव्वळ श्रेयवादामुळे हे झालेले सार्वजनिक पैशाचे दुहेरी नुकसान झाले असून ते कधीही भरुन येणारे नाही. श्रेयवादाची मानसिकता कुणाचीही असु नये. नागरिकांना मिळणा-या मुलभूत सुविधा केंद्रबिंदू ठेवल्या पाहिजेत.
आपणाला जमलं तर जरूर करावे. परंतु दुसरा काही करीत असेल तर, त्याला एक तर सहाय्य करा. नाही जमले तरी खोडा तरी घालु नका. श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे. राजकारण्यांचा व्यापक दृष्टीकोन असलाच पाहिजे. श्रेयवादापासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा, त्याचे दुष्परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून तत्कालिन कण्हेर उद्भव योजनेकडे पाहिले जाते. दादामहाराज ऊर्फ प्रतापसिंह महाराज यांचा हा मार्गदर्शक पायंडा आहे. पुरा काम तो किसीने रोका, मगर, आधेने तो पुराकाम किया है.. असा टोलाही उदयनराजेंनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.