Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बंद पडलेल्या एसटी बसला आमदाराचा 'धक्का' : स्टेअरिंग हाती घेताच बस सुरू!

Nilesh Lanke : लोकप्रतिनिधी कसे असावेत, याचे उदाहरणच लंके यांनी घालून दिल्याची भावना प्रवाशांमध्ये होती.

सरकारनामा ब्यूरो

अहमदनगर : एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यावर भल्याभल्यांच्या डोक्यात सत्तेची हवा जाते, असे म्हणतात. मात्र रस्त्यावर एक बस बंद पडलेली असते, दरम्यान त्याच मार्गावरुन जाणारे आमदार हे चित्र पाहतात. आमदारांची गाडी थांबते. नेमके काय घडले, याची माहिती ते घेतात. काय झाले आहे, याची विचारपूस सुरू करतात. गाडीतून बाहेर येत, रस्त्यावर उतरून एसटी बस दुरुस्तीसाठी काय करता येईल याची चाचपणी करतात. यानंतर चक्कं एसटी बसला धक्का देण्यासाठीही मागेपुढे पाहत नाहीत. हे सगळं घडले आहे, अहमदनगर- दौंड (Nagar Daund road)रस्त्यावर. कोळगाव दरम्यान शासनाची श्रीगोंदा-नगर एसटी बस (ST bus) बंद पडली होती.

बराच वेळ प्रयत्न करूनही बस काही सुरू होत नव्हती. नेमके त्याचवेळी योगायोगाने त्या रस्त्यावरून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) जात होते. लंके यांनी आपली गाडी थांबवली. काय घडले याचा माहिती घेतली. चक्कं बसला धक्का देत बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. तरीही बस सुरू होत नव्हती. धक्का देऊनही बस काही सुरू होत नाही म्हंटल्यावर, निलेश लंके स्वतःच बसच्या ड्रायव्हर सीटवर स्वार झाले. स्टेअरिंगची धुरा हातात घेतली. स्टेअरिंग हातात घेताच बस सुरू झाली. यामुळे अडकून राहिलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्वतः आमदार एसटी बस चालवत असल्याने, लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. लोकप्रतिनिधी कसे असावेत, याचे प्रत्यक्ष उदाहरणच लंके यांनी घालून दिल्याची भावना बसमधील अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये होती.

पारनेर मतदारसंघाचे आमदार असलेले निलेश लंके त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यांमुळे नेहमी चर्चेत राहीले आहेत. दुष्काळाच्या संकटात त्यांनी तालुक्यासाठी अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. कोविड आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांनी वैयक्तिकपणे एक हजार बेडपेक्षा जास्त कोविड रुग्णालयाची मतदारसंघात उभारणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT