शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार?; मुंबई महापालिकेचे धोरण ठरणार महत्त्वाचे

शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळ्यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समोरा-समोर आले आहेत
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व शिवसेना (ShivSena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमने-सामने आले आहेत. मेळाव्यासाठी दोन्ही गटांनी मुंबई पालिकेकडे अर्ज केले आहे. त्यावरून शिंदे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार, अशी चर्चा राज्यभरात सुरु झाली होती. मात्र, आता पालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच परवानगी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मेळावा किंवा सभेला परवानगी देण्याबाबत मुंबई पालिकेचे तसेच राज्य सरकारचे धोरणच शिंदे गटासमोरील अडचण ठरणार आहे. सभा किंवा मेळाव्यासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यांना परवानगी देण्याचे मुंबई पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावतीने मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उपलब्ध व्हावे, म्हणून मुंबई महापालिकेकडे सर्वप्रथम अर्ज केला आहे. शिवसेनेच्या अर्जाच्या जवळपास 15 दिवसांनंतर शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे, असा अर्ज केला. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या धोरणानुसार महापालिका ठाकरे यांच्याच अर्जाला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
शेलारांना पेडणेकरांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाल्या...

त्यातच अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवाजी पार्क मैदानाला उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार वर्षातून केवळ 45 दिवसच पार्कवर सभा, मेळावे घेण्यास परवानगी आहे. त्यामध्ये 45 दिवसांपैकी 9 दिवसांची परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. उर्वरित 36 दिवसांबाबत महापालिकेला परवानगी देण्याचे अधिकार आहेत.

यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे, राज्य सरकारच्या अखत्यारित जे दिवस आहेत. त्यामध्ये दसरा मेळावा येत नाही. त्यामुळे कुणाच्या दसरा मेळाव्याला परवानगी द्यायची, हा निर्णय घेण्याचा अधिकार पालिकेलाच आहे. राज्य सरकार यात फार ढवळाढवळ करू शकत नाही. काही कारण समोर करून राज्य सरकार पालिकेला काही सूचना करू शकते. निर्णय मात्र, मुंबई पालिकेलाच घ्यायचा आहे. यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असले तरी त्याचा दबाव दसरा मेळाव्याबाबतच्या निर्णयावर होईल, अशी शक्यता कमीच आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
बुलडाणा हा बिहार नाही; हल्ल्याचा उद्रेक संपूर्ण जिल्ह्यात होईल : शिवसेनेचा इशारा

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या, 'दसरा मेळावा त्याच मैदानावर होणार आहे. सगळे आता गजनी बनू बघत आहेत. प्रशासन हे गजनी होणार नाही अशी अपेक्षा आहे. शरद पवारांचा सल्ला ऐकावा, अर्थात सध्या भलतेच सल्ले ऐकले जात आहेत. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा' हा नियम आहे. ज्यांचा पहिला अर्ज येतो, तो मंजूर होतो हा नियम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com