Mahesh Shinde, Shashikant shinde satara reporter
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीनेच महाविकास आघाडी तोडली; कोरेगावचे वाटोळे करणाऱ्यांना जनता हद्दपार करणार....

जिल्हा बँकेच्या Dcc Bank election निवडणुकीत शिवसेनेने Shivsena जिल्ह्यात दोन जागा मागितल्या होत्या. त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला डावलले. त्यांनी डावलून ही आम्ही तीन जागा निवडून आणल्या.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : ''जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी तोडली. त्यामुळे आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन वाटचाल करत असून ज्यांनी कोरेगाव मतदारसंघात भ्रष्टाचार केला, तसेच मतदारसंघाचे वाटोळे केले त्यांना येथील जनता निश्चितपणे हद्दपार करेल,'' असा विश्वास शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीत आज ओबीसीच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. यासंदर्भात आमदार महेश शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. कोरेगाव नगरपंचायतीत आज उत्साहाने मतदान झाले. ज्यावेळी मतदानात उत्साह येतो. त्याला कारण गेल्या दोन वर्षात केलेली प्रचंड कामे, कोरेगाव शहरात केलेली कामे पाहता या नगरपंचायतीत परिवर्तन होणार आहे, असा विश्वास व्यक्त करून यावेळेस कोरेगावात निश्चित सत्ता परिवर्तन होईल.

महाविकास आघाडीची पथ्ये या निवडणुकीत पाळली गेली का, या प्रश्नावर महेश शिंदे म्हणाले, ''पहिल्यांदा महाविकास आघाडी राष्ट्रवादीने तोडली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यात दोन जागा मागितल्या होत्या. त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला डावलले. त्यांनी डावलून ही आम्ही तीन जागा निवडून आणल्या. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हाला बरोबर घेणार असतील तर, आम्ही आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच नाही.'' त्यामुळे यापुढे शिवसेना काँग्रेसला बरोबर घेऊन वाटचाल करत आहोत. यापुढेही वाटचाल करत राहणार आहोत.

तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही, असे शशीकांत शिंदे यांचा आरोप आहे, याविषयी विचारले असता महेश शिंदे म्हणाले, ''जे जनतेते राहतात, जनतेचे प्रश्न सोडवितात, पाच वर्षे जनतेसाठी झटणाऱ्यांना जनतेची सहानुभूती मिळते.'' कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेचे पॅनेल नाही, असे शशीकांत शिंदेंचे म्हणणे आहे, याविषयी महेश शिंदे म्हणाले, ''मी महायुतीतून आमदार म्हणून निवडून आलो आहे. अजूनही आमचे पक्ष तसेच आहेत. काही ठिकणी शिवसेना तर काही ठिकाणी सहयोगी पक्ष असे आम्ही एकत्र लढत आहोत. कोरेगाव विकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून काम करत असून आम्ही निश्चित परिवर्तन घडवू.''

जिल्ह्यात 'महाविकास' ची काय परिस्थिती राहिल या प्रश्नावर महेश शिंदे म्हणाले, ''मी जिल्ह्याचा नेता नाही. मी माझ्या मतदारसंघाचा नेता आहे. ज्यांनी मतदारसंघात भ्रष्टाचार केला, ज्यांनी या मतदारसंघाचे वाटोळे केले, त्यांना येथील जनता निश्चितपणे हद्दपार करेल,'' असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT