महेश शिंदे कोरेगावात राष्ट्रवादीला अडवणार; लढत जोरदार रंगणार

कोरेगाव Koregaon सोसायटी मतदारसंघाचे एकूण ९० मतदार आहेत. त्यातील अनेक सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे Nationalist congress वर्चस्व आहे. तसेच आमदार महेश शिंदे Mahesh shinde यांचे समथर्कही काही सोसायट्यांवर आहेत.
Mahesh shinde, Shashikant shinde
Mahesh shinde, Shashikant shindesarkarnama

वाठार स्टेशन : राजकीयदृष्टया संवेदनशील असलेल्या कोरेगाव तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातारण तापले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलमधून सोसायटी मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक व आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या सुनील खत्री यांच्यात चुरशीची लढत होत आहे. जावळीच्या मैदानात अडकल्याने शशिकांत शिंदे हे या मतदारसंघात लक्ष घालण्यात मर्यादा येत आहेत. तरीही राष्ट्रवादीविरोधात शिवसेना आमदार गट अशीच लढत कोरेगावच्या मैदानात पहायला मिळणार आहे.

कोरेगाव तालुक्यात सोसायटी मतदारसंघाचे एकूण ९० मतदार आहेत. त्यातील अनेक सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वचर्स्व असल्याचा दावा केला जात आहे. आमदार महेश शिंदे यांचे समथर्कही काही सोसायट्यांवर आहेत. दोन्ही आमदार गटातील कार्यकर्ते विजय आपलाच होणार, असा दावा करत आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची राहणार असल्याचे दिसते. राष्ट्रवादीने बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांचा पत्ता कट करुन शिवाजीराव महाडिक यांना मैदानात उतरविले आहे.

Mahesh shinde, Shashikant shinde
वाढदिनीच शशीकांत शिंदेंना महेश शिंदेंनी दिला धक्का; जिहे-कटापूरचे केले जलपूजन

सुनील माने यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सूचना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सुरवातीलाच केली होती. पण, त्यानंतरच्या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी होऊन पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. परिणामी, माने यांची उमेदवारी कापण्यात आली. त्याबद्दलची नाराजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कोरेगाव सोसायटींच्या मतदारांतही आहे. या नाराजीचा फटकाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

Mahesh shinde, Shashikant shinde
नवी नवरी लाथा मारत असेल तर, जागा दाखवू : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना इशारा

आमदार महेश शिंदे यांनी दिवसेंदिवस आपले स्थान घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा सुनील खत्री यांना होऊ शकतो. आमदार शशीकांत शिंदे हे जावळी सोसायटीच्या निवडणुकीत अडकल्याने त्यांना कोरेगावात फारसे लक्ष देता येणार नाही. त्याचाही काहीसा परिणाम दिसू शकतो. कोरेगाव सोसायटी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष घातले तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अवघड नाही. पण, नाराजांनी या निवडणुकीत बदलाचा सुर आळवला तर कोरेगावात अटीतटीची लढत अपेक्षीत आहे.

Mahesh shinde, Shashikant shinde
जिल्हा बॅंक हे तर निमित्त : शशिकांत शिंदेंचा `कार्यक्रम` करण्याचा मुहूर्त जुनाच !

रामभाऊ लेंभेंच्या लढतीकडेही लक्ष

नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघातून सहकारातील अनुभवी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेभे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलमधून उमेदवारी दिली आहे. सहकारातील अभ्यासू नेतृत्व म्हणून रामभाऊ लेंभे यांच्याकडे पाहिले जाते. ते कोरेगाव तालुक्यातील असल्यामुळे या लढतीकडेही कोरेगाववासियांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com