Dr. Mahendra Zaware Patil
Dr. Mahendra Zaware Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ukraine-Russia War : युक्रेनमध्ये अडकलेल्या नगरमधील विद्यार्थ्यांना परत यायचयं...

सचिन अगरवाल

अहमदनगर - रशिया-युक्रेन वाद वाढू लागला आहे. जगाला या वादामुळे महायुद्धाची चिंता वाटत आहे. अशात अहमदनगरमधील एक शिक्षण विषयक काम करणाऱ्या संस्थेने 40 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. हे विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. या संस्थेच्या चालकांशी सकाळ माध्यम समुहाच्या साम मराठीचे प्रतिनिधी सचिन अगरवाल यांनी संवाद साधला. ( The organization that takes students from Nagar district to Ukraine says ... )

अहमदनगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉ. महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील आहेत.

डॉ. झावरे पाटील म्हणाले की, माझ्याकडून युक्रेनला गेलेले अहमदनगर जिल्ह्यातील 17 ते 18 विद्यार्थी आहेत. माझी कन्सल्टन्सी सोडून पुणे, मुंबई, दिल्लीतूनही अॅडमिशन घेऊन विद्यार्थी युक्रेनला गेले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या मानाने हे प्रमाण चार ते पाच पट आहे.

ते पुढे म्हणाले की, माझ्याकडून जे विद्यार्थी युक्रेनला गेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क होत आहे. पालकांशीही संपर्क होत आहे. मुलांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी ते वसतिगृहात सुरक्षीत आहेत. ते ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्या विद्यापीठाचे वातावरण तरी त्यांना तसे दिसत नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सध्या युक्रेनची परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही. ही परिस्थिती चिघळण्या अगोदर भारतीय दुतावासाने प्रयत्न करून आम्हाला येथून बाहेर काढावे अशी मागणी विद्यार्थी व पालक करत असल्याचे डॉ. झावरे यांनी सांगितले.

आम्ही विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात आहोत. थोड्यावेळापूर्वीच आमचे त्यांच्याशी बोलणे झाले. वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. युक्रेनमध्ये चार विद्यापीठे आहेत. जिथे अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतीय दुतावासाने विद्यार्थांशी वेळोवेळी संपर्क केला आहे. विद्यार्थ्यांना भारतीय दुतावासाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास आम्ही सांगितले आहे. भारतीय दुतावास वेळोवेळी मदत करत आहे, असे डॉ. झावरे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT