Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil  Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

वाळूच्या पैशांचा माज पुढील दोन वर्षांत उतरविल्या शिवाय राहणार नाही

सरकारनामा ब्युरो

Dr. Sujay Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यात थोरात व विखे कुटुंबाचा संघर्ष जुना आहे. महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते होते. तर शिंदे गट व भाजप सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या काळातील कारभारावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आज टीका केली.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, संगमनेर तालुक्यात कालच माजी महसूल मंत्र्याच्या नातेवाईकाने एका कार्यकर्त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. हा सगळा वाळूच्या पैशांचा माज पुढील दोन वर्षांत उतरविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात पूर्णपणे एक पोर्टल सुरू केले जाईल. त्यावर लोकांनी फोटो अपलोड करून वाळू तस्करी करताना लोक सापडल्यास तेथील शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. पूर्णपणे वाळू तस्करी मुक्त अहमदनगर जिल्हा या संकल्पनेतून काम करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या त्या गोष्टी आम्ही करू, असे त्यांनी सांगितले.

आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर खासदार विखे पाटलांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री फडणवीस जो उमेदवार देतील त्याला आम्ही खासदार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT