Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ठाकरेंपाठीमागची संकटांची मालिका थांबेच ना; आता 'हा' नेता निवडणूक लढवण्यासाठी ठरला अपात्र

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray & Dnyaneshwar Patil News : उध्दव ठाकरे यांच्यामागची संकटांची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. कारण आधी शिवसेनेतील उभी फूट, पक्षाला लागलेली गळती, नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एक मोठा धक्का ठाकरेंना बसला आहे.

ठाकरे गटाचे नेते व भूम परंडा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार राहिलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांना पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरविण्यात आलं आहे. लातूर विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय दिला आहे. निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्यामागे २००१ नंतरचे अपत्य कमी दाखवल्याचं कारण दिलं आहे. याबाबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांचे पुतणे व उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी २१ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार दिली होती.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर पाटील(Dnyaneshwar Patil) हे संचालक होते. प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. यावर आता लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

भूम परंडा मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील हे २ वेळा शिवसेनेचे आमदार होते. तसेच शिंदे गटाचे नेते व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.मात्र, शिवसेनेतील उभ्या फूटीनंतर पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पाटील यांचं भूम परंडा मतदारसंघात चांगलं वर्चस्व राहिलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना पहिल्या पत्नीपासून दोन अपत्य आहेत. मात्र, पहिल्या पत्नीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर पाटील यांनी दुसरा विवाह केला. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून १५ सप्टेंबर २००६ रोजी पहिले अपत्य तर दुसरे अपत्य १५ ऑक्टोबर २००८ रोजी झाले. या चारही अपत्यांच्या जन्माची नोंद बार्शी नगर परिषदेत करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर २००१ नंतर २ अपत्य असल्याचं कारण देत पाटील यांचं संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती. याची सुनावणी लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी करताना पुढील ५ वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही असा निर्णय दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT