Chinchwad By-Election : 'पराभव दिसू लागल्याने भाजप गुंडगिरीवर उतरली' : रोहित पवारांचे टीकास्त्र!

Rohit Pawar : "काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे," रोहित पवारांचे विधान
Chinchwad By-Election : rohit Pawar
Chinchwad By-Election : rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे चिंचवड पोटनिवडणुकातील पक्षाचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज दुसऱ्यांदा चिंचवडला आले होते. 'पराभव दिसू लागल्यानेच भाजप गुंडगिरीवर उतरल्याचे' प्रतिक्रिया रोहित पवारांनी कालच्या शिवसेना शहरप्रमुखांवरील हल्ल्याच्या घटनेवर दिली आहे.

Chinchwad By-Election : rohit Pawar
Kasba By-Election : 'गद्दारांविरूद्ध पहिलं बंड पुण्यातून होणार ; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी !

यावेळी रोहित पवार म्हणाले, "लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजपचा पराभव करण्याचा निश्चय सामान्य मतदारांनी केल्याचे स्पष्ट दिसत असून काटे यांचा विजय निश्चित आहे. भाजपला पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरली असून, शिवसेनेच्या शहराध्यक्षांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे"

दरम्यान रोहित पवार यांनी, किवळे गावठाण, मामुर्डी, आदर्शनगर, विकासनगर, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवी भागात त्यांनी पदयात्रा काढली. त्यात माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, शहर युवक अध्यक्ष इमरान शेख आदी सहभागी झाले होते.

Chinchwad By-Election : rohit Pawar
Kasba By-Election : अक्षय गोडसे यांचा व्हिडीओ : म्हणाले...माझा पाठिंबा हेमंत रासनेंनाच!

"भाजपने पाण्याच्या मुलभूत समस्येचेही राजकारण केले. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणण्याच्या योजनेला त्यांनी विरोध केला. ही योजना पूर्णत्वास जाऊ नये, असे प्रयत्न केले, असा आरोप आ. पवार यांनी केला. काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com