Solapur News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संभाजीराजेंच्या भूमिकेचा पहिला दणका; राज ठाकरेंचा आवाज असलेला चित्रपट पाडला बंद

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडला

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापुरात (Solapur) 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो सकल मराठा समाजाने बंद पाडला आहे. सोलापुरातील 'इ स्क्वेअर मल्टिप्लेक्स'मध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु होता. हा चित्रपच सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला.

तसेच यापुढे असे इतिहासाची मोडतोड करणारे चित्रपट दाखवू नये, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या १९ प्रेक्षकांच्या तिकिटाचे पैसे ही परत करायला लावले. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सोलापुरात तीव्र पडसाद उमटले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजीमहाराजांवर निर्माण होणाऱ्या चित्रपटांवर टीका केली होती.

'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या दोन चित्रपटांवर आक्षेप घेतला होता. महाराष्ट्राच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे चालणार नाही यापुढे आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आपल्याला मराठ्यांचा इतिहास दाखवायचा आहे का? मध्येच काहीतरी सुरू झाले मराठी आणि मराठे. पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण. सगळे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार म्हणजे मराठी. हे कुठून आले मराठे आणि मराठी? मराठी ही जात नव्हती. हे चालणार नाही, असा सज्जड इशारा संभाजीराजे यांनी दिली होता. त्यानंतर आज त्यांचे पडसात सोलापुरात उमटले.

हर हर महादेव हा चित्रपट सुबोध भावे यांचा आहे. या चित्रपटासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आवाज दिलेला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी आक्षेप घेतल्यानंतर आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपट बंद पाडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT