AMC Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेत आता कामगारांचीही संपाची हाक

अहमदनगर महापालिकेतील ( Ahmednagar Municipal Corporation ) थकीत बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी विकासकामे करण्यास नकार देत संप सुरू केला आहे.

अमित आवारी

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेतील ( Ahmednagar Municipal Corporation ) थकीत बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी विकासकामे करण्यास नकार देत संप सुरू केला आहे. अशातच आता महापालिका सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने कामगार संघटनेने संपाची हाक दिली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे. महापालिकेतील सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एकपारगी काम नेमूण देण्याच्या महापौर रोहिणी शेंडगे ( Rohini Shendge ) व स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांचे आदेशाचे महापालिका प्रशासनाकडून होत नसल्याने अहमदनगर महापालिका कामगार संघटना आक्रमक झाली आहे. The strike is now being called by the workers in the Municipal Corporation

संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी महापालिका आयुक्त, महापौर व स्थायी समिती सभापतींना निवेदनातून संपाची नोटीस दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील 10-12 दिवसांपासून महापालिकेतील सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एकपारगी काम नेमून देण्याच्या युनियनच्या मागणीबाबत विचारविनिमय करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांचे उपस्थितीत महापौर कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शंकर शेडाळे तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संघटनेच्या मागणीबाबत त्रिपक्षीय चर्चा होवून 1 डिसेंबरपासून महापालिकेतील सर्व सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एकपारगी देण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे व स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी महापालिका प्रशासनास दिले होते. या आदेशाला महापालिका आयुक्त व उपायुक्तांनी मान्यता दिली होती. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. या आदेशाचे पालन करण्यास महापालिका अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे. सकाळ व दुपारच्या सत्रात महापालिकेतील सफाई कामगारांकडून काम करून घेण्याच्या सूचना संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना तोंडी स्वरूपात देवून अंमलबजावणी करण्याचे, सक्ती करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सफाई कामगारांवर दडपशाही करण्याचे सत्र अवलंबिले आहे. त्यामुळे महापालिकेतील सफाई कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. महापालिकेतील सफाई कामगारांसह सर्व कर्मचारी सोमवार ( ता. 6 ) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहे. सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एकपारगी काम नेमुन देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT