अखेर दिलीप गांधींच्या घरात उधळला गेला गुलाल

नगर अर्बन बॅंकेवर ( Nagar Urban Bank ) माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी ( Dilip Gandhi ) प्रणीत सहकार पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांचे पाणिपत केले.
Dilip Gandhi's family
Dilip Gandhi's familySarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : नगर अर्बन बॅंकेवर ( Nagar Urban Bank ) माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी ( Dilip Gandhi ) प्रणीत सहकार पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांचे पाणिपत केले. या विजयामुळे तब्बल चार वर्षांनंतर दिलीप गांधी यांच्या घरात गुलाल खेळला गेला. ढोल ताशांच्या आवाजाचे निनाद ऐकू आला. Finally, Gulal was scattered in Dilip Gandhi's house

या निवडणुकीत सहकार पॅनल विरोधात अर्बन बँक बचाओ कृती समितीकडून निवडणूक लढविण्यात आली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी चार जागांवरील अर्बन बँक बचाओ कृती समितीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भागधारक मतदारांना सहकार पॅनल विरोधात सक्षम पॅनल व उमेदवार दिसेनात.

Dilip Gandhi's family
पंतप्रधानांच्या सभेच्या वेळी दिलीप गांधी या कारणाने संतापले होते, अन आले डोळ्यात पाणी

सहकार पॅनलच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित 14 जागांसाठी रविवारी (ता. 28) मतदान झाले. मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरविली त्यामुळे अवघे 31.65 टक्के मतदान झाले. हे कोणत्याही सहकारी संस्थेच्या निवडणुकीतील सर्वात कमी मतदान होते.

नगर-कल्याण रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थित आज मतमोजणी प्रक्रिया झाली. 48 केंद्रावरील मतदान पाच फेऱ्यांत मोजण्यात आले. या सर्व जागांवर सहकार पॅनलचेच उमेदवार विजयी झाले. पॅनलप्रमुख सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलने निवडणूक लढविली होती. त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी विजयी झाल्या. अर्बन बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची उद्या ( बुधवारी ) निवड होणार आहे.

Dilip Gandhi's family
सुवेंद्र- दिप्ती गांधींना 'विशाल गणपती' पावला! 

चार वर्षांतील गांधी कुटूंबाचा संघर्ष

नगर अर्बन बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मागील सहा वर्षांपासून होत होता. विरोधकांनी नगर अर्बन बँकेसंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी केल्या होत्या. महापालिका निवडणुकीत दिलीप गांधी यांनी भाजपचाच महापौर होईल असे सांगितले होते. सुवेंद्र गांधी यांनी महापौर बनविण्याची तयारी त्यांनी केली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसह दिग्गज नेते बोलावण्यात आले होते. सुवेंद्र गांधी व त्यांच्या पत्नी दिप्ती गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र सुरवातीला त्यांचा उमेदवारी अर्ज छाणणीत बाद ठरविण्यात आला.

गांधींनी न्यायालयीन लढा लढत उमेदवारी अर्ज वैध ठरविले खरे मात्र निवडणुकीत सुवेंद्र व दिप्ती गांधी यांना मतदारांनी नाकारले. हा दिलीप गांधींना मोठा राजकीय धक्का होता. यातच लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलीप गांधींना उमेदवारी न देता काँग्रेसमधून आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दुखावलेल्या दिलीप गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतच अश्रू अनावर झाले. यातच अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्त केला. मागील वर्षी दिलीप गांधी यांचे निधन झाले. या संघर्षमय कालखंडामुळे दिलीप गांधींच्या घरासमोर मागील चार वर्षांत कधी आनंदाने गुलालाची उधळण झाली नाही की ढोलताशा वाजला नाही. अखेर आजच्या विजयामुळे गांधींच्या घरासमोर ढोल ताशाही वाजला आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलालाची उधळणही केली.

Dilip Gandhi's family
नगर अर्बन बँक निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप

हे झाले विजयी

उमेदवारी अर्ज माघारी नंतर सहकार पॅनलचे संगीता गांधी, मनेष साठे, मनीषा कोठारी, दिनेश कटारिया हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. आज झालेल्या मतमोजणी नंतर जिल्हा उपनिबंधकांनी सहकार पॅनलच्या दीप्ती गांधी, अजय बोरा, अनिल कोठारी, ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी, महेंद्र गंधे, राजेंद्रकुमार अग्रवाल, राहुल जामगावकर, शैलेश मुनोत, संपतलाल बोरा, कमलेश गांधी, अतुल कासट, अशोक कटारिया, सचिन देसरडा यांना विजयी घोषित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com