Dhananjay Mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Basket Bridge: विरोधकांनी खिल्ली उडवलेल्या बास्केट ब्रिजचं भूमिपूजन धनंजय महाडिक गडकरींच्या हस्ते करणार

Kolhapur : बहुचर्चित बास्केट ब्रीजच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला

संभाजी थोरात

कोल्हापूर : महापूर आला की कोल्हापूरचा संपर्क तुटतो त्यामुळे शहरात प्रवेश करताना उंच पूल असावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होती. धनंजय महाडिक लोकसभेला निवडून आल्यानंतर त्यांनी 2017 ला वरळी सिलिंकच्या धर्तीवर बास्केट ब्रीजची संकल्पना मांडली आणि पाठपुरावा सुरू केला.

मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेकडून बास्केट ब्रीजची खिल्ली उडवण्यात आली. मात्र, आता या ब्रीजला 180 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 28 जानेवारीला या ब्रीजचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे या ब्रीजवरून पुन्हा एकदा कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापणार आहे.

कोल्हापूरमध्ये महापूर आला की, पुणे- बेंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलावरून पाणी जाते आणि कोल्हापूरचा संपर्क तुटतो. त्यामुळे याठिकाणी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत होती. यासाठी 2017 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रीजची संकल्पना मांडली.

या पुलामुळे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार होती आणि पुरामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवरही मात करता येणार होती. या पुलासाठी धनंजय महाडिक यांनी खासदार असताना पाठपुरावा केला. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर हा पूल रखडेल अशी चर्चा होती. महाडिक यांनी 2019 नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि या पुलाचा प्रस्तावच नसल्याची टीका होऊ लागली.

काही निवडणुकांमध्ये हा प्रचाराचा मुद्दा होता. शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसकडून बास्केट ब्रीजवर टीका होत होती. मात्र, राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक जिंकले आणि दिल्लीत पुन्हा या पुलासाठी पाठपुरावा सुरू झाला. या पुलाला 180 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरात येण्याबरोबरच व्यापारी पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरलाही या पुलाचा उपयोग होणार आहे.

दरम्यान, 28 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा बास्केट ब्रीजचा मुद्दा घेऊन काँग्रेस, शिवसेनेला कोंडीत पकडणार हे स्पष्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT