Jawali News: जावळीकरांसाठी 'गुड न्यूज': प्रतापगड- किसन वीर कारखान्यांतील करार संपुष्टात

Shivendraraje Bhosale आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख भूमिकेमुळे कारखाना पुन्हा एकदा जावळीकरांच्या स्वाधीन झाला आहे. प्रतापगड कारखाना लवकरच नव्या जोमाने कार्यरत होत आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Surabh Shinde, Makrand Patil, Nitin Patil
Surabh Shinde, Makrand Patil, Nitin Patilsarkarnama
Published on
Updated on

Jawali News : सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना (Pratapgad Sugar Factory) व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने (Kisan Veer Sugar Factory) सन २०१२-१३ पासून केलेला भागीदारी करार आज नऊ वर्षांच्या कालखंडानंतर सामंजस्याने संपुष्टात आणला. त्यामुळे प्रतापगड कारखाना आता किसन वीरच्या व्यवस्थापनाकडून मुक्त करण्यात आल्याने प्रतापगड पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आहे.

प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन २०१२-१३ रोजी भागीदारी करार करून प्रतापगड कारखाना सहकारात टिकविण्याचे काम केले होते. शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना १२ महिने काम मिळावे, वेळेवर पगार मिळावा, या हेतूने हा करार त्यावेळच्या संचालक मंडळाने केला होता.

परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांच्या कालखंडातील गेल्या पाच वर्षांत प्रतापगडचे तीन गळीत हंगाम किसन वीर व्यवस्थापनाने बंद ठेवले. यामुळे शेतकरी, कामगारांसह कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कारखाना चालविण्यास देण्याचा मूळ हेतूचे साध्य होत नसल्यामुळे हा करार मोडण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्याबाबत साखर आयुक्तांकडे लवादही दाखल केला होता.

Surabh Shinde, Makrand Patil, Nitin Patil
Shivendraraje: धर्मवीर की स्वराज्यरक्षक वाद; शिवेंद्रराजेंनी राजकारण्यांना ठणकावलं ,म्हणाले...''

दरम्यान, किसन वीरची निवडणूक लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी निवडणुकीवेळी सत्तांतर करा. जावळीचा प्रतापगड जावळीकरांच्या स्वाधीन करण्याचा शब्दही दिला होता. त्यानुसार सत्तांतर झाल्याने किसन वीरचे अध्यक्ष मकरंद पाटील, तसेच संचालक नितीन पाटील यांनी प्रतापगडच्या व्यवस्थापनास करार संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करून करार संपुष्टात आणला.

Surabh Shinde, Makrand Patil, Nitin Patil
'किसन वीर'चा यावर्षीचा हंगाम यशस्वी करणार... मकरंद पाटील

या वेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीरचे संचालक, तसेच प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, दादा फरांदे, नाना पवार, आनंदराव मोहिते व संचालक मंडळ उपस्थित होते. किसन वीर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल प्रतापगडच्या संचालकांनी आभारही मानले.

Surabh Shinde, Makrand Patil, Nitin Patil
Satara News: पालिका इमारतीसाठी उत्खनन केलेले गौण खनिज परस्पर विकले; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com