Udayan Gadakh
Udayan Gadakh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायत राजकारणातून पडलेली दरी उदयन गडाखांनी आणली जुळून

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : ग्रामपंचायतस्थरावरील निवडणुका पक्षावर नव्हे तर पॅनलवर लढल्या जातात. यात काही वेळा एकाच पक्षातील कार्यकर्ते परस्परा विरोधात निवडणूक लढतात. यातून वाद होतात. हे वाद परिपक्व नेतृत्त्व ताबडतोब मिटविते. असाच प्रत्यय युवा नेते उदयन गडाख ( Udayan Gadakh ) यांनी घडविला आहे. The valley that fell from the Gram Panchayat politics was brought together by Udayan Gadakh

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बेल्हेकरवाडी (ता. नेवासे) येथील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याच दोन गटात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दरी निर्माण झाली होती. हा वाढलेला दुरावा जवळ करत युवानेते उदयन गडाख यांनी आजी-माजी सरपंचाना एकत्र करीत विकासात्मक मनोमिलन घडवून आणले. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

बेल्हेकरवाडी ते नवनाथनगर व बेल्हेकरवाडी ते राजळेवस्ती डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी उदयन गडाख गावात आल्यानंतर त्यांनी माजी सरपंच भरत बेल्हेकर व विद्यमान सरपंच कानिफनाथ येळवंडे यांची समजूत काढली. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून झालेला दोन गटांचा दुरावा जुळून घेत एकजुटीतून गावात विकास कामांचे भूमिपूजन केले. आजी-माजी सरपंचानी गडाखांचा एकत्र सत्कार करताच ग्रामस्थांनी या एकजुटीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत आढाव यांनी केले. अध्यक्षस्थानी अशोक आदमाने होते. बेल्हेकरवाडीचे उपसरपंच दत्तात्रेय बेल्हेकर, सोनईचे सरपंच धनंजय वाघ, माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, सुनील बेल्हेकर, उदय पालवे, त्रिंबक आढाव, काशीनाथ घोलप उपस्थित होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या रचनात्मक कार्यामुळे आज सोनईला मोठे वैभव प्राप्त झाले आहे. याचे जतन या पिढीने जपावे, असे गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मागील पाच वर्षांत सर्वांना बरोबर घेवून गावगाडा हाकला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दोन गटांत लढत झाली असली तरी दोन्ही गट जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मानणारे आहेत. विकास कामासाठी नेहमीच साथ दिली जाईल.

- भरत बेल्हेकर, माजी सरपंच, बेल्हेकरवाडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT