Umesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Theft in Umesh Patil's Bungalow: राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या बंगल्यात चोरी

Solapur News: या प्रकरणी मोहोळ पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी आणलेले दीड लाख रुपये किमतीचे प्लंबिंग व हार्डवेअरचे साहित्य चोरून नेल्याची घटना १४ डिसेंबर २०२२ रोजी घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Theft in NCP spokesperson Umesh Patil's bungalow)

ओमप्रकाश राणाराम सुतार व प्रकाशचंद कनीराम सुतार (दोघेही, रा. जालोडा, ता फलोदी, राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकातून जाणाऱ्या ढोकबाभूळगाव रस्त्यालगतच्या गोदामासमोर उमेश पाटील यांचा बंगला आहे. या बंगल्याचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी प्लंबिंगचे सुमारे एक १ लाख २८ हजार रुपयांचे साहित्य आणून बांधकाम चालू असलेल्या बंगल्यात ठेवले होते. बंगल्याचे काम चालू असल्याने त्याला दरवाजे लावलेले नाहीत.

बंगल्याचे बांधकाम चालू असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडे गेल्या ६ वर्षांपासून स्वीय सहायक म्हणून नोकरीस असलेले प्रमोद तुळशीराम आतकरे (रा. देगाव, ता. मोहोळ) हे १५ डिसेंबर २०२२ रोजी देखरेखीसाठी बंगल्यावर गेले होते. बंगल्यात प्लंबिंगचे काम चालू होते. प्लंबर खांडेकर याच्याकडे कामाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, बॉक्समध्ये नवीन आणून ठेवलेले प्लबिंगचे साहित्य दिसत नाही. आतकरे यांनी बॉक्स उघडुन पाहिले असता ते रिकामे आढळून आले.

यापूर्वी प्लॅबिंगचे काम करणारे ओमप्रकाश सुतार व प्रकाशचंद सुतार हे दोघे न विचारताच गावाकडे निघून गेले होते. ते रविवार (ता २६ मार्च) बंगल्यावर आतकरे हे देखभालीचे काम करत असताना नेमके आले. ओमप्रकाश सुतार, प्रकाशचंद सुतार हे दोघे त्यांच्या गावाकडून बंगल्यावर त्यांचे मशिनरी व सुतार काम करण्याचे साहित्य घेऊन जाण्यासाठी आले होते. आतकरे यांनी त्यांना प्लबिंग साहित्याबाबत विचारणा केली असता ते काही सांगत नव्हते. त्यामुळे प्लबिंग व हार्डवेअरचे दीड लाख रुपयाचे साहित्य ओमप्रकाश सुतार व प्रकाशचंद सुतार व त्यांच्या साथीदारांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रमोद आतकरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT