Ghansham Shelar, Shivajirao Kardile, Rahul Jagtap, Baban Pachpute News
Ghansham Shelar, Shivajirao Kardile, Rahul Jagtap, Baban Pachpute News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmadnagar Politics : शेलारांनी तिकिटासाठी हैदराबाद गाठले; पण कर्डिले सर्वांचा गेम बिघडविणार

- संजय आ. काटे

Srigonde News : घनशाम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. शेलार यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना किती फायदा होणार हे पाहण्यासाठी वेळ येवू द्यावी लागणार, असली तरी त्यामुळे राजकीय गणिते बदलली आहेत. नागवडे, शेलार व जगताप यांच्यातील मतविभागणी पाचपुते यांच्या पथ्यावर पडते हे जरी खरे असले तरी यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी मनावर घेतले तर श्रीगोंद्यातील नेत्यांना हात चोळण्याची वेळ येवू शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे.

घनशाम शेलार यांनी बुधवारी (ता. १४) बीआरसी या तालुक्याच्या दृष्टीने नवख्या पक्षात प्रवेश केला. अजून विधानसभेला वेळ आहे, राष्ट्रवादीत शेलार यांच्या शब्दाला मोठी किंमत होती तरीही ते नेत्यांवर अविश्वास दाखवित अचानक एनसीपीला रामराम करीत बीआरसीत जावून बसले आहेत. याचा अर्थ त्यांना राष्ट्रवादीची (NCP) उमेदवारी मिळण्याची शाश्वती नव्हती यावरही शिक्कामोर्तब झाले.

शेलार यांच्या या राजकीय बदलाने तालुक्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहेत. २०१४ ला आमदार पाचपुते यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याची खेळी खेळली गेली आणि त्यात यश आले. त्यावेळी पाचपुते यांच्याविरोधात मतविभागणी झाली नाही तर पाचपुते यांना आमदारकी सोपी नाही हे समोर आले. त्यानंतर २०१९ मध्येही प्रबळ लढत पाचपुते व शेलार यांच्यात झाली तीत पाचपुचे यांचा निसटता विजय झाला.

आता जगताप, नागवडे, शेलार यांच्यासह अण्णासाहेब शेलार यांनाही आमदारकीचा मोह झाला आहे. अजून निवडणुकीला वेळ असला तरी सध्याची स्थिती आघाडीला अडचणीची आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शेलार यांची उमेदवारी नागवडे यांची नातेगोत्याच्या मतात विभागणी करणारी ठरेल. त्यातच ते कुकडी पट्यात येत असल्याने जगताप यांनाही त्यांची अडचण होईल. मात्र, याचा अर्थ असा नाही होत की शेलार यांच्यासाठी अलबेल आहे. यापुर्वी त्यांच्यासोबत दोन विधानसभेला पक्षाची व नेत्यांची ताकत होती. गेल्यावेळी लाखाच्या घरातील त्यांना पडलेल्या मतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहानुभूतीचा मोठा वाटा होता.

आता ही सगळी मतविभागणी पाचपुते यांच्या फायद्याची ठरेल असे वर वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे होणार नसल्याचे बोलले जाते. त्याचे प्रमुख कारण पाचपुते यांचे वाढते व आजारपण आहे. गेल्या चार वर्षात पहिले पाचपुते दिसले नाहीत. त्यांच्या कुंटुंबातील प्रतिभा पाचपुते या पहिल्यापासून संपर्कात आहेत. घोड पट्ट्यात नागवडे यांनी घेतलेली उचल पाचपुते यांच्यासाठी अडचणीची आहे.

तालुक्यात संभाव्यांची संख्या वाढल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले (Shivajirao Kardele) हे श्रीगोंदे मतदारसंघात चाचपणी करीत असल्याची माहिती आहे. वाळकी, चिचोंडीपाटील गटासोबतच मांडवगण गट त्यांना सोयीचा आहे. तालुक्यात मतांची विभागणी झाली तर त्यांच्या सगळेच पथ्यावर पडेल. शिवाय पाचपुते यांचे आजारपणाचा पक्ष किती गांभीर्याने विचार करतो हेही पाहावे लागेल.

कुठे लढायचे हे भाजपचे नेते ठरवतील

मी राहूरी विधानसभा मतदारसंघातून लढलो आहे. यंदाही तेथूनच लढणार आहे. मात्र, श्रीगोंद्यातील बदलती समिकरणे व नगर तालुक्यातील दोन गटासह मांडवगण हा जवळचा गटही असल्याने श्रीगोंद्यातून लढा असा निरोप येत आहे. कुठे लढायचे हे भाजपचे (BJP) नेते ठरवतील. मात्र, जेथे लढेन तेथे जिंकण्यालाठी असेन, असे शिवाजीराव कर्डिले, यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT