Vinayak Raut News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने विधान परिषदेत खाते उघण्यात यश मिळविले आहे. विधान सभेतील तब्बल ४० आमदार पाठीशी असतानाही विधान परिषदेत मात्र शिंदे गटाची पाटी कोरीच होती. मात्र, ठाकरे गटाच्या नाराज आमदार मनीषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेची विधान परिषदेत एन्ट्री होणार, असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकेर) गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी कायंदे यांच्यावर टीका केली आहे.
मनीषा कायंदे (Manish Kayande) या ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून नाराज होत्या. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. विशेषतः वकूब असूनही पक्ष संघटनेत त्यांना डावलेले जात असल्याची त्यांची खंत होती. मात्र, कायंदे शिंदे गटात जाण्याचे कारण विनायक राऊत यांनी सांगितले आहे.
विनायक राऊत म्हणाले, पुढच्या विधान परिषदेच्या टर्मसाठी आपल्याला कसे सावरता येईल, यासाठी त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असले. ज्यावेळी राजकारणात यांना काडिची किंमत नव्हती. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना जवळ केले. त्या जाणार यांची कल्पना दोन महिन्यापासून होती, असेही राऊत म्हणाले.
त्यांना ज्यावेळी राजकारणात किंमत नव्हती. त्यावेळी त्यांना राजकारणात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांना आमदारकी दिली. ज्यावेळी ठाकरे गटाला गरज असताना त्या पक्षाला सोडून जात आहे. त्यांनी खरेदी विक्री सुरु केली आहे. त्यांना फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचा आहे. मात्र, अशा स्वार्थी लोकांना जवळ घेऊन त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेची भक्कम बाजू आहे, असेही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.