Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil On Budget : बजेटमध्ये राज्याला 'लॉलीपॉप'; सतेज पाटील भाजपवर तुटून पडले

Union Budget 2024 : देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur Political News : महायुती सरकारचे या टर्मचे पहिले केंद्रीय अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर येऊन निदर्शन केली. आता राज्यातील काँग्रेस नेते आणि आमदार यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प बजेटवर सडकून टीका केली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेले बजेट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना लॉलीपॉप दाखवणारे आहे अशी टीका विधिमंडळाचे गटनेते आणि काँग्रेसचे आमदार माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.

देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते, हे कळत नाही. बिहार व आंध्र प्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प या दोन राज्यांसाठीच मांडला असल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीत तरुणांनी हिसका दाखवल्यानंतर रोजगाराच्या संधीचा खोटा आभास तयार करणारे बजेट मांडले आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने बेरोजगारांना खोटी आश्वासने तर दिलीच पण सर्वसामान्य घटकांनाही लॉलिपॉप दाखवले आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

एनडीएमध्ये एकनाथ शिंदे Eknath Shinde सहभागी असतानाही महाराष्ट्रात एकही प्रकल्प त्यांना आणता आलेला नाही. याउलट नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः च्या राज्यासाठी लाखो कोटींची तरतूद करून घेतली आहे. आधीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. त्यात अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला डावलून या राज्याचे महत्व कमी करण्याचा केंद्रातील वरीष्ठ नेत्यांचा डाव असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

बजेटमधील सापत्न वगवणूक राज्यातील जनता विसरणार नाही. लोकसभेला धडा शिकावला त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही या दुजाभावाचे योग्य उत्तर जनता देईल, असा इशाराही सतेज पाटील Satej Patil यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT