Rohit Pawar On Budget : 'भाजप नेत्यांची लायकी दाखवून केंद्राची महाराष्ट्राला...'; रोहित पवारांची तिखट प्रतिक्रिया

Union Budget 2024 : बिहार आणि आंध्रच्या नेत्यांना बार्गेनिंग आणि पाठपुराव्याचे फळ मिळाले. तर आपल्या नेत्यांनी केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग केले नाही.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेच्या नव्या सभागृहात मंगळवारी (ता. 23) मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प मांडला.

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची बळकट करणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या राज्यासाठी विशेष तरतूद केल्याचे दिसले. तर या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळाली, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

लोकसभेच्या सभागृहात सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आले. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासाठी अर्थसंकल्पात विशेष स्थान मिळाल्याने ‘हे खुर्ची वाचव बजेट आहे,’ असा निशाणा तृणमूल काँग्रेसने साधला आहे. तर शरद पवार गटाकडून महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले.

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिल्याचा आरोपही केला.

Rohit Pawar
Prashant Jagtap On Amit Shah : तडीपार अमित शाह यांना पुण्याच्या जगतापांनी, 'असं काही सुनावलं...'

दरम्यान, पुण्यात आलेले केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shah यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याला अनुसरून रोहित पवार म्हणाले, कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल. तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते.

हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या बार्गेनिंग आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. आपल्या नेत्यांनी केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग केले नाही. त्यांनी महाराष्ट्र हितासाठी थोडा पाठपुरावा केला असता तरी राज्याला एखादी घोषणा झाली असती.

असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

Rohit Pawar
Sassoon News : रुग्णाला निर्जनस्थळी टाकणारा ससूनमधील डॉक्टर निलंबित !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com