Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्हा विभाजनापेक्षा समतोल विकास झाला पाहिजे

कर्जत नगर पंचायत निवडणुकीनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी शुक्रवारी (ता. 21) अहमदनगरमधील दैनिक सकाळच्या कार्यालयाला भेट दिली.

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - कर्जत नगर पंचायत निवडणुकीनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी शुक्रवारी ( ता. 21 ) अहमदनगरमधील दैनिक सकाळच्या कार्यालयाला भेट दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनावर दरवेळी राजकीय वाद होत असतात. यावर रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. There should be more balanced development than division of Ahmednagar district

या प्रसंगी रोहित पवार यांचे नगर आवृत्तीचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी अग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके, वरिष्ठ उपसंपादक अशोक निंबाळकर, वरिष्ठ बातमीदार मुरलीधर कराळे, कर्जतचे वार्ताहर नीलेश दिवटे आदी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले की, अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होण्याची चर्चा होतेय, माझ्या मते जिल्ह्याचे विभाजन व्हावे की नाही यावर बोलण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्व भागात समतोल ठेवून समान पद्धतीने विकास होणे गरजेचे आहे. विकासात असमतोल झाला तर लोकांत अन्यायाची भावना तयार होते. तशी भावना तयार होऊ नये यासाठीच विकासाचा समतोल साधणे गरजेचे आहे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रोहित पवार पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा मोठा आहे. विभाजनावर चर्चा होते, मात्र माझ्या मते विभाजनवर बोलण्यापेक्षा समान विकासावर बोलले पाहिजे. जिल्ह्याचा सर्वागिंन विकास ही नेत्यांची प्रमुख जबाबदारी आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी पर्यटन, औद्योगिक, पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, आदीसह मूलभूत प्रश्नाबाबतचे धोरण ठरवणे गरजेचे आहे.

अहमदनगर शहर हे मुख्यालय आहे, त्यामुळे येथील प्रमुख समस्या आणि प्रश्न सुटावेत. जिल्ह्याच्या सर्वच भागात समतोल विकास झाला तर विभाजनाची मागणी होणार नाही. मात्र जोपर्यंत समतोल विकास साधला जात नाही तो पर्यत जो भाग विकासापासून दूर आहे तोवर लोकांची अन्याय झाल्याची भावना आणि जिल्हा विभाजनाची मागणी सुरुच राहिल.

कर्जत जामखेडच्या विकासावर चर्चा करताना त्यांनी यावेळी माजीमंत्री राम शिंदे यांच्यावरही निशाना साधताना म्हणाले, लोकांत उतरुन काम करावे लागते. लोकांनी मला विधानसभेत आणि आता नगर पंचायतीच्या  निवडणुकीत भरभरुन प्रेम दिले. दोन वर्षे लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत. या काळात लोकांना आधार देण्याची गरज असते. ते त्या काळात गायब होते. दहा वर्षांत कर्जतला साधे संपर्क कार्यालय काढू शकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी राम शिंदेंवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT