Sangli District Teachers Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli District Teachers Bank: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत तुफान राडा; गुरुजींनी थेट व्यासपीठावर फेकली अंडी

Sangli District Primary Teachers Cooperative Bank: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला.

Ganesh Thombare

राहुल गडकर :

Sangli News : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला आहे. जगाला ज्ञान देणाऱ्या गुरुजींनी वार्षिक सभेत थेट व्यासपीठावरच अंडी भिरकावली. त्यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत चांगलाच गदारोळ उडाला. दोन्ही गटांत राडा झाल्यानंतर गुरुजींच्या या पराक्रमाची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली. या प्रकारामुळे मात्र गुरुजी जरा दमानं घ्या! अशी म्हणायची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे.

शिक्षक सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या सभागृहात पार पडली. जिल्हाभरातून प्राथमिक शिक्षकांनी त्याला हजेरी लावली होती. बँकेच्या नवीन इमारत बांधकामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू होते.

याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी करताच सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या गोंधळाचे रूपांतर राड्यात झाले. शिक्षकांच्या या गोंधळात व्यासपीठाच्या दिशेने काही जणांनी अंडी फेकली.

त्यानंतर विरोधकांनी अंडी फेकल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. ज्या शिक्षकांनी अंडी भिरकावली त्या शिक्षकांना चोप देण्यात आला. सत्ताधारी आक्रमक होताच विरोधकांनी नरमाईची भूमिका घेत सभागृह सोडले. यानंतर सभेचे कामकाज शांततेत पार पडले.

बँकेच्या नवीन इमारत बांधकामासह विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली. दरम्यान, अंडी फेकणाऱ्या सभासदांवर कडक कारवाई करून सभासदत्व रद्द केले जाईल, असा इशारा बँकेच्या अध्यक्षांनी दिला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT